जॅक क्रॉली आणि टिम साउथी(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारतीय संघ ३८७ धावा करून सर्वबाद झाला. याआधी इंग्लंडकडून पहिल्या डावात इतक्याच ३८७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी इंग्लंडला फक्त एक षटक फलंदाजी करता आली. या दरम्यान इंग्लंडने एकही विकेट न गमावता २ धावा केल्या आहेत. संघाकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉली नाबाद आहेत. या दरम्यान इंग्लंडचा सलामीवरी जॅक क्रॉलीला दुखापत झाली.
भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवसाचा शेवटचा षटक जसप्रीत बुमराहकडून टाकण्यात आला. या षटकात एक चेंडू जॅक क्रॉलीच्या ग्लोव्हजवर आदळला. यामुळे खेळात व्यत्यय निर्माण झाला आणि भारताला दुसरे षटक टाकता आले नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारासह सर्व खेळाडूंनी नाराज झाल्याचे दिसून आले. आता इंग्लंडचे गोलंदाजी सल्लागार टिम साउथी यांनी क्रॉलीबद्दल मोठी माहिती.
हेही वाचा : Aus vs WI : मिचेल स्टार्कचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा कारनामा: दिग्गज ग्लेन मॅकग्ग्राच्या पंक्तीत झाला सामील..
तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ एक षटक खेळायला मिळाले. बुमराहच्या शेवटच्या षटकातील पाचवा चेंडूवर जॅक क्रॉलीच्या ग्लोजवर आदळला. यामध्ये क्रॉलीच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओला त्याची दुखापत पाहण्यासाठी मैदानावर पाठवावे लागले. यानंतर, शेवटचा चेंडू खेळल्यानंतर जॅक क्रॉलीला मैदानाबाहेर जावे लागले.
क्रॉलीच्या या दुखापतीबद्दल, इंग्लिश संघाचा गोलंदाजी सल्लागार टिम साउथीने माहिती दिलीये आहे. स्टिच चौथ्या दिवशी खेळणार तो नाही याबद्दल विधान केले आहे. साउथी म्हणाला कि, “झॅक क्रॉलीची रात्री तपासणी करण्यात येईल जाईल आणि आशा आहे की त्याला खेळणे सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळेल.” क्रॉलीच्या दुखापतीनंतर त्याच्या फिटनेसबद्दल बरीच चर्चा करण्यात आली होती.
लॉर्ड्स कसोटी आता एका रोमांचक वळणावर आला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात एकूण ३८७ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानेही ३८७ धावाच केल्या. आता दुसऱ्या डावात इंग्लंडने एकही विकेट न गमावता २ धावा केल्या आहेत. आता, इंग्लंड संघाने चौथ्या दिवशी कितीही धावा केल्या तरी, टीम इंडियाला जिंकण्यासाठी तेवढ्या धावा कराव्या लागणार आहे.
हेही वाचा : Wimbledon ला मिळणार किंग! Carlos Alcaraz आणि Jannik Sinner आज फायनलमध्ये भिडणार
दुसऱ्या डावात येथे धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी नकीच सोपे असणार नाही. अशा परिस्थितीत, टीम इंडिया इंग्लंडला किमान धावसंख्येपर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न करणारा आहे. त्याच वेळी, इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असणार.