फोटो सौजन्य – X (Wimbledon)
Carlos Alcaraz vs Jannik Sinner : विम्बल्डनचा उत्साह आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लंडनमधील ऑल इंग्लंड टेनिस क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या ग्रँड स्लॅम विम्बल्डनला आज विजेता मिळणार आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पेनचा सलग दोन वेळा विम्बल्डन विजेता कार्लोस अल्काराज इटलीचा जॅनिक सिन्नरशी सामना करेल. हा सामना फ्रेंच ओपन २०२५ च्या अंतिम सामन्याचा रीमॅच आहे.
या सामन्यात अल्काराजने रोमांचक सामन्यात सिनरचा पराभव केला आणि विजेतेपद जिंकले. आता पुन्हा एकदा अल्काराजचे डोळे ट्रॉफीवर आहेत, तर सिनरकडे कार्लोसकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. कार्लोस अल्काराझ (स्पेन) हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. २२ वर्षीय या स्टारने ५ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये (फ्रेंच ओपन: २०२४, २०२५, विम्बल्डन: (२०२३, २०२४, यूएस ओपन: २०२२) यांचा समावेश आहे. त्याचा आवडता शॉट फोरहँड आहे. त्याने विम्बल्डन २०२५ च्या उपांत्य फेरीत टेलर फ्रिट्झचा ६-४, ५-७, ६-३, ७-६(६) असा पराभव केला.
We watched in awe in Paris. Now, the privilege is ours.#Wimbledon pic.twitter.com/fFXvoPRdSl
— Wimbledon (@Wimbledon) July 13, 2025
जॅनिक सिन्नर (इटली) चे जागतिक क्रमवारीत १ आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्याने ३ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये (ऑस्ट्रेलियन ओपन: २०२४, २०२५, यूएस ओपन: २०२४) यांचा समावेश आहे. त्याचा आवडता शॉट बॅकहँड आहे. विम्बल्डन २०२५ च्या उपांत्य फेरीत नोवाक जोकोविचचा ६-३, ६-३, ६-४ असा पराभव केला.
अल्कराज आणि सिन्नर हे दोघे आत्तापर्यंत बारा वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये अल्कराझ आणि आत्तापर्यंत आज सामने जिंकले आहेत तर सिनर आणि आतापर्यंत चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सिनर याने दिग्गज नोवाक जोकोविच याला सेमी फायनल मध्ये पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. टेलर फ्रित्झ याला अल्कराजने सेमी फायनल मध्ये पराभूत केले आणि फायनल मध्ये प्रवेश केला आहे.
फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीनंतर बरोबर पाच आठवड्यांनी, सिनर आणि अल्काराज पुन्हा एकमेकांसमोर येतील. फरक एवढाच की फ्रेंच ओपनचा अंतिम सामना लाल रेतीवर खेळला गेला तर विम्बल्डनचा अंतिम सामना गवताच्या कोर्टवर होईल. अल्काराजने फ्रेंच ओपनचा अंतिम सामना पाच तास २९ मिनिटांत जिंकला आणि रविवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा कठीण लढत अपेक्षित आहे. ग्रँड स्लॅम फायनलमध्ये अल्काराजचा ५-० असा विक्रम आहे. सिनरच्या नावावर तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. अल्काराजने विम्बल्डनमध्ये सलग २४ सामने जिंकले आहेत आणि तो ही संख्या वाढवण्याचा दृढनिश्चय करेल.