बेन स्टोक्स(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या पाच सामान्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे, या बातमीला ईसीबीकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला आहे. उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स या मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकणार नाही.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, “उपकर्णधार ऑली पोप आता गुरुवारपासून ओव्हल येथे खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करेल.” पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने अशी आघाडी घेतली आहे. दुखापतग्रस्त कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ओव्हल येथील भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.
हेही वाचा : भारताला मोठा झटका! World Athletics Championships मधून स्टीपलचेस खेळाडू अविनाश साबळे बाहेर; कारण आले समोर..
इंग्लंड संघाचा आधारस्तंभ आणि कर्णधार ज्याने संघाला नेतृत्वासबतच आपल्या बॅटने देखील मोलाची साथ दिली, असा स्टोक्स खांद्याच्या दुखापतीमुळे ओव्हल येथील पाचव्या कसोटी सामन्यात खेकणार नाही. तो दुखापतीममुळे बाहेर पडला आहे. तर आर्चरला चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतल्यानंतर विश्रांती देण्यात आलिया असल्याची माहिती आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, “वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स देखील शेवटचा कसोटी सामना खेळणार नाही.”
उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे कर्णधार बेन स्टोक्स उपलब्ध असणार नाही. फिरकी गोलंदाज लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे देखील संघाचा भाग असणार नाहीत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, “इंग्लंडने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जेकब बेथेलचा संघात समावेश केला आहे. तसेच सरेचे गोलंदाज गस अॅटकिन्सन आणि जेमी ओव्हरटन यांच्यासह नॉटिंगहॅमशायरचा वेगवान गोलंदाज जोश टोंग यांचा देखील संघात समावेश असणार आहे.”
हेही वाचा : IND vs ENG : ओव्हल कसोटीत ‘हा’ स्टार प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवा.., माजी भारतीय फलंदाज पार्थिव पटेलचे मत
इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टोंग.