शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना चांगलाच रंगतदार होत असल्याचे दिसत आहे. मँचेस्टर येथे खेळला जाणाऱ्या सामन्यात अनेक घडामोडी बघायला मिळत आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३५८ धावा उभ्या केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने सर्वबाद ६६९ धावा केल्या आहेत. यासोबत इंग्लंडने चौथ्या दिवशी ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युउत्तरात भारताने पाचव्या दिवशी ३विकेट्स गमावून १९३ धावा केल्या आहेत. कर्णधार शुभमन गिल धावा ९५ तर वाशिंग्टन सुंदर ४ धावांवर खेळत आहे. या दरम्यान भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलने मँचेस्टर कसोटीमध्ये एक इतिहास रचला आहे. सेना देशांमध्ये कसोटी मालिकेत ७०० धावा करणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात ८१ धावा करताच गिलने हा पराक्रम केला आहे.
भारतीय संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने शनिवारी (२६ जुलै) सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत आशियाई फलंदाजाने सर्वाधिक कसोटी धावा केल्याचा खालसा केला आहे. त्याने विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला आहे. गिल आता सेना देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. गिलने मँचेस्टर कसोटीत 74 धावा करताच विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. सेना देशांमध्ये मालिकेत आशियाई फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नवे नोंदवण्यात आला होता. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या 58 व्या षटकामध्ये गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. जो रूटच्या चेंडूवर चौकार लगावून गिलने ही कामगिरी केली आहे.
तसेच शुभमन गिलने आज पाचव्या दिवशी स्टोक्सच्या चेंडूवर दोन धावा घेताच हा पराक्रम केला. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावातील ६५ व्या षटकात गिलने या मालिकेत ७०० धावा पूर्ण केल्या आहेत. आता तो सेना देशांमध्ये ७०० धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू बनला आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत आशियाई फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर नोंदवण्यात आला होता. २००६ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना युसूफने ६३१ धावा फटकावल्या होत्या.