टिम इंडिया(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : युवा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत इंग्लंडने भारतीय संघाचा ५ विकेट्सने पराभव करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. हा सामना लीड्समध्ये खेळवण्यात आला होता. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोर तयारी केली आहे.
बर्मिंगहॅम कसोटीत, टीम इंडिया पहिल्या सामन्यात अनेक चुका केल्या त्याचा फटका संघाला सामना गमावून बसला. आता संघ त्याच चुका पुन्हा करू इच्छित नाही. पहिल्या कसोटीदरम्यान, टीम इंडियाने क्षेत्ररक्षणासोबतच खालच्या फलंदाजीच्या क्रमात अनेक चुका केल्या आहेत. असे बोलले जात आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यात, टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, एजबॅस्टन कसोटीपूर्वी, टीम इंडियाचे गोलंदाज दोन रंगांच्या चेंडूने सराव करताना दिसून आले आहेत.
हेही वाचा : यश दयालच्या अडचणी वाढल्या! लैंगिक छळाच्या प्रकरणाने घेतले वेगळे वळण; कथित प्रेयसीकडून पुरावे समोर..
लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात, जसप्रीत बुमराह वगळता सर्व गोलंदाज अपयशी ठरलेले दिसून आले. यादरम्यान, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे खेळाडू त्यांच्या मूळ लयीत दिसले नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय संघ आयपीएल २०२५ नंतर लगेचच इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना झाला होता. अशा परिस्थितीत, आयपीएल लाईन लेंथपासून मुक्त होण्यासाठी, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दोन रंगांच्या चेंडूने सराव केला आहे.
सरावाबद्दल बोलताना, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी सांगितले की, दोन रंगांच्या चेंडूने सराव केल्याने मर्यादित षटकांच्या सवयींपासून दुसर जाण्यास मदत मिळते. तसेच रायन पुढे म्हणाले की, ही सामान्य गोष्ट नाही. सर्व चेंडू उत्पादक कंपन्या असे चेंडू बनवत असतात. आम्हाला टीम इंडियाच्या गोलंदाजांची मर्यादित षटकांच्या लाईन लेंथची सवय सुधारायची असल्याचे टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी सांगितले.
हेही वाचा : IND vs ENG : बुमराह Playing 11 मधून बाहेर, कुलदीपचा पण पत्ता कट होणार! या दोन खेळाडूंना मिळणार संधी?
सहाय्यक प्रशिक्षकाने पुढे असे देखील म्हटले आहे की, “आयपीएलच्या दीर्घ हंगामानंतर टीम इंडियाचे गोलंदाज कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मोर्ने मॉर्केल टीम इंडियाशी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून तो असे प्रयोग करत आहे.”