टिम इंडिया(फोटो-सोशल मिडिया)
IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा उभारल्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाअखेर भारताने २ गडी गमावून ९२ धावा करून भारताकडे आता ९६ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन माघारी गेले आहेत. तर केएल राहुल ४७ धावांवर नाबाद आहेत आणि शुभमन गिल ६ धावांवर आहेत.
हेही वाचा : जेव्हा मिस्ट्री स्पिनर बनला फिनिशर! चौकार – षटकार मारुन संपवला सामना
तिसऱ्या दिवशीच्या टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडविरुद्ध खूप धावा मोजल्या आहेत. जरी तो तीन विकेट घेण्यात यशस्वी झाला असला तरी इंग्लिश फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध चांगल्याच धावा फटकावल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णाने सामन्यात १२८ धावा दिल्या आहेत. यासोबतच त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एक लाजिरवाणा विक्रम देखील नोंदवला आहे.
लीड्स कसोटीत प्रसिद्ध कृष्णा भारतासाठी एकूण कसोटीत सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. कसोटी स्वरूपात टीम इंडियासाठी २० किंवा त्याहून अधिक धावांचा स्पेल टाकताना त्याची इकॉनॉमी खूपच खराब राहिली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध ६.४० च्या इकॉनॉमीने धावा मोजल्या आहेत.
हेही वाचा : टशनबाजी सुरू… ENG vs IND सामन्यादरम्यान सिराज आणि ब्रूक मैदानावर भिडले! पहा Viral Video
आता तो धावा देण्याच्या बाबतीत त्याने वरुण आरोनला मागे टाकले आहे. २०१४ मध्ये अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आरोनने ५.९१ च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या होत्या. आनंदाची गोष्ट म्हणजे कृष्णाने केवळ धावा दिल्या नाहीत तर ३ विकेट्स देखील घेतल्या आहेत. त्याने शतक झळकावणाऱ्या ऑली पोपला माघारी पाठवले होते. त्यानंतर त्याने ९९ च्या स्कोअरवर हॅरी ब्रूकची विकेट काढली होती. त्याच वेळी, प्रसिद्ध कृष्णा जेमी स्मिथला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात देखील यशस्वी झाला.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.