भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय (फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ, 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली गेली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. भारताला ४६ ओव्हरमध्ये सर्वबाद ३३८ धावाच करता आल्या. परिणामी भारताला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ही मालिका २-१ ने आपल्या नावे केली आहे.
न्यूझीलंडने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करायला भरतीती संघ चांगलाच अडचणीत आला होता. दिग्गज फलंदाज लवकरच माघारी गेले होते. ७१ धावांवर भारताच्या ४ विकेट्स गेल्या होत्या. रोहित शर्मा ११ धावा करून बाद झाला. तर कर्णधार शुभमन गिलही २३ धावा करू शकला. उपकर्णधार श्रेयस अय्यर देखील झटपट ३ धावा करून बाद झाला. मागच्या सामन्यातील शतकवीर केएल राहुल १ धाव घेऊन पव्हेलियनमध्ये गेला. संघ अडचणीत असताना विराट कोहलीने नितीश कुमारच्या साथीने विराटने डाव सावरला. या दोघांनी ८८ धावा जोडल्या. नितीश ५७ चेंडूत ५३ धावा करून माघारी गेला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याला ख्रिश्चन क्लार्कने बाद केले. रवींद्र जाडेजा १२ धावा करून बाद झाला. एका बाजूने विकेट्स जात होत्या, त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरला. त्याने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
विराटने हर्षित राणाला साथीला घेऊन डाव गेहून जाण्याचा प्रयत्न केला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हर्षित राणाने ४३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार लगावले. त्यांनंतर मोहम्मद सिराज भोपळा न फोडता माघारी गेला. दरम्यान, विराट कोहली १०८ चेंडूत १२४ धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार लगावले. तो मैदानात होता तोपर्यंत भारत सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र तो बाद झाला आणि भारताने सामना गमावला. कुलदीप यादव ५ धावांवर धावबाद झाला आणि अर्शदीप सिंग ४ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून झॅकेरिन फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या तर लेनॉक्सने दोन विकेट्स घेतल्या. तर काइल जेमिसनने १ विकेट घेतली.
भारत खेळणारा इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड खेळणारा इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅकेरिन फॉल्क्स, काइल जेमिसन, ख्रिश्चन क्लार्क,लेनॉक्स






