ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : 9 गोल्ड मेडल जिंकून भारताच्या बॉक्सर्सने रचला इतिहास! जास्मिनने ऑलिम्पिक चॅम्पियनला हरवले
ईडन गार्डन्स कसोटीदरम्यान मानेच्या गंभीर दुखापतीमुळे नियमित कर्णधार शुभमन गिलला संघाबाहेर पडला आहे. त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले, त्यानंतर संघ व्यवस्थापनाने पंतकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये पंतने आपली प्रतिक्रिया दिली. पंत म्हणाला की, “कर्णधारासाठी एकच सामना हा सर्वोत्तम पर्याय नाही, परंतु हा सन्मान दिल्याबद्दल तो बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) चे आभार मानतो. कधीकधी, जर तुम्ही एखाद्या मोठ्या संधीबद्दल जास्त विचार केला तर त्याचा काही उपयोग होत नाही. मला त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही. पहिली कसोटी आमच्यासाठी कठीण गेली आणि आम्ही कसोटी जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणार आहोत.”
ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत झालेल्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे, जिथे पहिल्या डावात फलंदाजी करताना गिलला दुखापत झाली होती आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
ऋषभ पंतने ही देखील सांगितले आहे की, संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी गिलच्या जागी कोण खेळेल याचा निर्णय आधीच घेण्यात अल आहे, परंतु त्या खेळाडूचे अद्याप नाव उघड करण्यात आले नाही. “शुबमन गिलची जागा कोण घेईल हे आम्ही ठरवले असून खेळणाऱ्या खेळाडूला माहिती देण्यात आली आहे.”
ऋषभ पंत पुढे म्हणाला की, “मला पारंपारिक राहायचे आहे आणि चौकटीबाहेर देखील विचार करायचा आहे. मला चांगला समतोल साधायचा आहे. आपल्याला गोष्टी सोप्या ठेवाव्या लागणार आहे आणि जो संघ चांगले क्रिकेट खेळेल तोच जिंकणार आहे.” पंतने गिलचे या महत्त्वाच्या सामन्यासाठी उपलब्ध राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याबद्दल त्याचे कौतुक देखील केले आहे.
पंत म्हणाला की, “शुभमन गिल सामना खेळण्यास उत्सुक होता. परंतु, शरीर त्याला साथ देत नसताना देखील त्याने लवचिकता दाखवली आणि खेळाडूंकडून तुम्हाला अशाच प्रकारची वृत्ती पहायला हवी असते. मी दररोज गिलशी बोलतो. मला काल संध्याकाळीच कळले की मी या सामन्याचे नेतृत्व करणार आहे.” असे देखील पंत स्पष्ट केले.






