फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काल मालिकेचा दुसरा T२० सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाची फलंदाजी ढासळली आणि भारताच्या संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या संघाला ३ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली परंतु ते टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेला टीम इंडियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी साधली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताच्या संघाने फलंदाजी करत भारताचे पहिले दोन सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनीही लवकर विकेट गमावला आणि भारताच्या संघाची फलंदाजी डगमगली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने फक्त संघासाठी ४ धावा केल्या. टिळक वर्माने २० धावांची खेळी खेळली तर अक्षर पटेलने २७ धावांची खेळी खेळली. भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा हार्दिक पांड्याने केल्या. हार्दिकने संघासाठी ४५ चेंडूंमध्ये ३९ धावा केल्या. रिंकू सिंहने ९ धावा केल्या अर्शदीप सिंहने संघासाठी ७ धावा केल्या.
हेदेखील वाचा – IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली, जाणून कधी आणि कुठे पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग
भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर वरून चक्रवर्तीने संघासाठी अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. त्याने संघासाठी ४ ओव्हरमध्ये १७ धावा देत ५ विकेट घेतले. रवी बिश्नोईच्या हाती एक विकेट लागली, तर अर्षदिप सिंहने सुद्धा एक विकेट नावावर केली. त्यानंतर आवेश खान, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या यांच्या हाती एकही विकेट लागली नाही.
A thriller in Gqeberha as South Africa win the 2nd T20I by 3 wickets to level the series 1-1#TeamIndia will aim to bounce back in the next match
Scorecard – https://t.co/ojROEpNVp6#SAvIND pic.twitter.com/Cjw0ik0m4q
— BCCI (@BCCI) November 10, 2024
सामन्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला, “तुम्हाला जे काही टोटल मिळते, ते तुम्हाला नेहमी पाठीशी घालायचे असते. T20 सामन्यात तुम्हाला एकूण 125 किंवा 140 धावा करायच्या नसतात, पण आमच्या मुलांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याचा मला अभिमान वाटतो. गोलंदाजांबद्दल बोलताना म्हणजेच .” फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “T20 सामन्यात, 125 धावांचा पाठलाग करताना एखाद्याला फाइव्हर मिळतो आणि या परिस्थितीत, हे अविश्वसनीय आहे. त्याने आपल्या खेळावर खूप मेहनत घेतली आणि “ते या टप्प्याची वाट पाहत होते आणि त्याचा खेळ पाहायला खूप मजा आली.