ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर (फोटो- सोशल मिडिया)
बीसीसीआयने सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या जागी २१ वर्षीय युवा यष्टिरक्षक-फलंदाज कुमार कुशाग्र याचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुशाग्रची ही निवड तूर्तास केवळ मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठीच करण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंत खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय पंतच्या तंदुरुस्तीचा आढावा घेतल्यानंतर नंतर घेतला जाईल.
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल ‘इंडिया ए ’ संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, कर्णधारपद आणि संघासाठी विकेटकीपिंग देखील ध्रुव जुरेलच करणार आहे. या दौऱ्यासाठी घोषित करण्यात आलेल्या इंडिया अ संघात भारतीय सीनियर संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या संघात सीनियर संघाचा उपकर्णधार केएल राहुल, धडाडीचा सलामीवीर यशस्वी जयसवाल आणि मध्यरष्टीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल यांच्यासह एकूण १० कसोटी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इंडिया ए संघाची ताकद नक्कीच वाढलेली आहे.
घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने नुकत्याच एका पॉडकास्ट दरम्यान वनडे क्रिकेटमधून आणि टी 20 संघातून वगळले गेले, त्यावर भाष्य केले आहे. संघात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त करतानाच, एक खेळाडू म्हणून मिळालेल्या प्रत्येक अपयशानंतर पुन्हा खंबीरपणे उभे राहणे कसे गरजेचे असते, हे त्याने स्पष्ट केले.






