भारतीय कसोटी संघ(फोटो-सोशल मीडिया)
India created history in the Delhi Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या खिशात टाकला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने धूळ चारली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा २-० असा पराभव करून मलिका जिंकली.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली त्याने मायदेशात पहिली मालिका जिंकली आहे आणि त्यासोबत २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा पहिलाच मालिका विजय ठरला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सात सामने खेळले असून भारताने चार सामने जिंकले आहेत, दोन गमावले आहेत आणि एक अनिर्णित राहिला आहे.
यासह, अरुण जेटली स्टेडियमवर भारताने आपली अजिंक्य मालिका कायम रखण्यास यश मिळवले आहे. भारतीय संघाने या मैदानावर आता सलग १४ कसोटी विजय मिळवण्याची किमया साधली आहे. ज्याची सुरुवात मार्च १९९३ मध्ये झिम्बाब्वेवर एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवून झाली होती. ही भारताची मायदेशात सर्वात मोठी अजिंक्य मालिका राहिली आहे. मोहाली आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारताच्या १३ सामन्यांच्या अपराजित मालिकेचा हा विक्रम ठरला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात चार फलंदाजांनी शतके झळकावली आहेत,भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले. यशस्वी जयस्वालने १७५ आणि शुभमन गिलने नाबाद १२९ धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी शतके झळकावली आहेत. जॉन कॅम्पबेलने त्यांचे पहिलेच कसोटी शतक झळकावले. कॅम्पबेलने ११५ आणि शाई होपने १०३ धावा केल्या आहेत.
हेही वाचा : शुभमन गिलने मोडली एमएस धोनीची परंपरा? India vs West Indies मालिका जिंकल्यानंतर त्याने कोणाला ट्रॉफी दिली…
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ५१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपला. भारताला पहिल्या डावाच्या आधारे २७० धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध फॉलोऑन लावला. फॉलोऑनमध्ये वेस्ट इंडिजने ३९० धावा करून भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य उभे केले. जे भारताने केवळ तीन विकेट गमावून पूर्ण केले आणि सामन्यासह भारताने मलिका जिंकली.