India Lost The Match By Five Runs West Indies Lead In The Series
पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव, मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली.
त्रिनिदाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात वन-डे मॅच झाल्यानंतर कालपासून टी-20 मालिकेला (T20 Series) सुरुवात झाली आहे. (WI vs IND 1st T20) झाली आहे. काल पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा पाच धावांनी पराभव झाला आहे. या विजयामुळं मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारताला (India) विजयासाठी दिडशे धावांचे आव्हाने दिले होते. याचा पाठलाग करताना भारताचे नऊ फलंदाज बाद झाले. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजने ( west indies) या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
भारताची खराब सुरुवात…
दरम्यान, वेस्ट इंडिजने दिलेल्या 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीच्या फलंदाजंनी निराशाजनक कामगिरी केली. सलामी जोडी सपेशल फ्लॉप ठरली. इशान किशन 6 आणि शुबमन गिल याने 3 धावा करुन मैदानाहबाहेरचा रस्ता धरला. कुलदीप यादव 3 रन्स केल्या. तर युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार दोघेही 1 धावेवर नाबाद राहिले, मात्र त्यांना विजय मिळवून देता आलं नाही. 28 धावांत भारताने दोन विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाकडून डेब्यूटंट तिलक वर्मा याने सर्वाधिक 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावांच योगदान दिलं. कॅप्टन हार्दिक पंड्या निर्णायक क्षणी 19 रन्स करुन माघारी परतला. अक्षर पटेल याने 13, तर संजू सॅमसन याने 12 धावा केल्या. अर्शदीप सिंह 12 धावांवर रन आऊट झाला. या सहा जणांशिवाय इतर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
विडिंजचे 150 धावांचे आव्हान
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट घेत विडिंजला बॅकफूटवर ढकलले. ब्रँडन किंग आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 29 धावांची भागीदारी केली. चहलने विंडिजला या एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले. चहलने मेयर्सला 1 आणि किंगला 28 धावांवर आऊट केलं. जे चार्ल्स याने 3 रन्स केल्या. निकोलस पूरन याने 41 रन्स जोडल्या. तर कॅप्टन रोवमेन पॉवेल याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलने 2-2, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
Web Title: India lost the match by five runs west indies lead in the series