दुबई : तुम्ही जर किक्रेटप्रेमी असाल तर २००७ सालची भारत-पाकिस्तानमधील (India Vs Pakistan ) टी-२० वर्ल्डकपची बॉल आउटमधील मॅच कधीच विसणार नाहीत. या ऐतिहासिक सामन्यामुळं पुढे भारताने इतिहास घडवला. त्याचीच काहीशी पुनरावृत्ती घडली असल्यामुळं थेट २००७ सालचा टी-२० (T-20 world cup) विश्वचषकाची आठवण झाली. आशिया कप (Asia Cup) स्पर्धेला येत्या २७ ऑगस्ट रोजी सुरूवात होणार आहे. यासाठी दोन्ही संघाचा कसून सराव सुरु आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन देशातील माजी खेळाडू दुबईत (Dubai) दाखल झाले आणि या खेळाडूंमध्ये एक स्पेशल शो दरम्यान बॉल आउट मॅच (Ball out match) झाली. या सामन्यात सुद्धा भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला.
[read_also content=”राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbal-help-to-accident-in-mumbai-nashik-road-317741.html”]
दरम्यान, मैत्रीपूर्ण लढतीत देखील पाकिस्तानचा भारताने पराभव केला आहे. यामुळं २००७च्या टी-२० वर्ल्डकपच्या आठवणी जागृत झाल्या. भारताने तिनही चेंडूवर दांड्या गुल्ल केल्या. मात्र पाकिस्तानला एकदा ही विकेटवर चेंडू मारता आला नाही. त्यामुळं पाकचा पराभव झाला.
When it’s ?? ? ??, it’s bound to be ?!
Watch the former stars of the #GreatestRivalry ⚔️ in a bowl out in 2018 & don’t miss #INDvPAK in #AsiaCup2022 on Aug 28, 6 PM onwards on Star Sports & Disney+Hotstar.@shoaib100mph | @VVSLaxman281 | @LaxmanSivarama1 | @iramizraja pic.twitter.com/73MvQa5DSL
— Star Sports (@StarSportsIndia) August 18, 2022
बॉल आउट सामन्यात भारताकडून सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन (Sunil Gavaskar, VVS Laxman and Laxman Sivaramakrishnan) यांनी तर पाकिस्तानकडून रमीज राजा, शोएब अख्तर आणि आमिर सोहेल (Rameez Raja, Shoaib Akhtar and Aamir Sohail) हे खेळाडूनी बॉलिंग केली. दरम्यान, या वर्षी युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ तारखेला हायव्होल्टेज मॅच दुबईत होणार आहे.