सिडनी : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत आणि नेदरलँड (Netherlands) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा दुसरा सामना आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना सहा गडी गमावले होते. पाकिस्तानच्या विजयाने भारताचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असणार. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय किंग कोहली विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला. आणि विजयश्री खेचून आणली. आज भारतीय संघात बदल करण्यात आल्याचे समजते. भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अपयशी ठरली होती.
आज नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळलेला संघच नेदरलँड्सविरुद्ध खेळविला जाणार असल्याचे संकेत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी दिले आहेत. त्यामुळे नेदरलँड्सचा संघ तुलनेने कमकुवत असला तरी भारताचे संघ व्यवस्थापन कुठलही जोखीम घेणार नाही. विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकच्या समावेशामुळे भारताची फलंदाजी चांगलीच मजबूत झाली आहे. अनुभवी महंमद शमी, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अर्शदीप सिंग गोलंदाजी भक्कम आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरले होते. मात्र त्यांना आजच्या सामन्यात धावा करण्याची चांगली संधी आहे. भारताच्या ग्रुप २ मध्येही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले. आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी येथे मॅच होणार आहे, परंतु त्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. सध्या दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे, आणि त्यातही पावसाचा व्यत्यय येतोय. त्यामुळं भारत व नेदरलँड्स यांच्या सामन्यात सुद्धा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.