फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
ICC महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक गुणतालिका : भारतीय संघ अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकात विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. सुपर-६ मध्ये बांगलादेशचा पराभव करून भारताने पुन्हा एकदा पॉइंट टेबलमध्ये नंबर-१ स्थान मिळवले आहे. या विजयासह भारताचे उपांत्य फेरीचे तिकीटही जवळपास निश्चित झाले आहे. टीम इंडियाचा शेवटचा सामना स्कॉटलंडविरुद्ध आहे. तो सामना जिंकून टीम इंडिया बाद फेरीत प्रवेश करेल. आम्ही तुम्हाला सांगतो, सुपर-६ फेरीत एकूण १२ संघांचा समावेश आहे, यामध्ये ६-६ संघाचे दोन गटात विभागले करण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत.
ग्रुप-१ च्या पॉइंट टेबलवर एक नजर टाकल्यास भारत विजयाची हॅट्ट्रिकसह अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचे ३ सामन्यांत एकूण ६ गुण आहेत आणि त्यांचा निव्वळ धावगती +६.००९ आहे, जो स्पर्धेतील सर्वोत्तम आहे. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता जवळजवळ उपांत्य फेरीमध्ये स्थान पक्के केले आहे. भारताव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने देखील गट-१ मध्ये एकही सामना गमावलेला नाही, परंतु त्यांचा निव्वळ धावगती +२.१७६ असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत. गट १ मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ उपांत्य फेरीमध्ये जाऊ शकतात. आज सुपर सिक्स सामन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर ICC महिला अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात प्रवेश करेल.
IND vs ENG :संजू सॅमसन राजकोटमध्ये रचणार इतिहास, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला सोडू शकतो मागे
ग्रुप-2 बद्दल बोलायचे झाले तर येथे दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाप्रमाणेच आफ्रिकन संघही सातत्याने विजयांची हॅट्ट्रिक करत अव्वल स्थानावर बसला आहे. +३.२१५ च्या निव्वळ रन रेटसह दक्षिण आफ्रिकेचे ६ गुण आहेत. इंग्लंड ४ गुणांसह दुसऱ्या तर नायजेरिया ३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा पुढचा सामना न्यूझीलंडशी असून नायजेरियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे, या दोन्ही सामन्यांमध्ये अपसेट झाल्यास नायजेरियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकते. पण त्याची शक्यता खूपच कमी आहे.
पहिल्या गटामध्ये सहाव्या स्थानावर वेस्ट इंडिजचा संघ आहे, संघाने एकही सामन्यांमध्ये विजय मिळवला नाही. तर पाचव्या स्थानावर स्कॉटलंडचा संघ आहे यामध्ये स्कॉटलंडच्या संघाने तीन पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. बांग्लादेशचा संघ गट १ च्या गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहे. बांग्लादेशच्या संघाने तीन पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर १ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या गटामध्ये तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे. यामध्ये श्रीलंकेच्या संघाने १ सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तर एक सामन्याचा निर्णय आला नाही दुसऱ्या गटामध्ये अजूनही शेवटच्या दिनी सुपर सिक्सचे सामने शिल्लक आहेत त्यामुळे चित्र अस्पष्ट आहे.