फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताच्या संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवले होते. तोच आत्मविश्वास घेऊन भारताचा संघ चीनमध्ये होणाऱ्या 2024 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. टीम इंडिया हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारताचा हॉकी संघाचा आज सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आज दोन्ही संघ 2024 आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने असणार आहेत. भारताच्या हॉकी संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे त्यांनी सलग सामान्यांमध्ये विजय मिळवून उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज भारतीय संघ शनिवारी म्हणेजच १४ सप्टेंबर रोजी अखेरच्या राऊंड रॉबिन लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
गुणतालिकेवर नजर टाकली तर भारताच्या संघाने आतापर्यत चार सामने जिंकले आहेत, यामध्ये चारही सामन्यांमध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने आतापर्यत ३ सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांना फक्त १ सामन्यामध्ये विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे कोरिया आणि मलेशियाच्या संघ आहे. या दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. जपानचा संघ तळाला आहे त्यामुळे त्यांनी अजुनपर्यत एकही सामना जिंकलेला नाही.
A rivalry that never gets old! 🏑🔥
Team India🇮🇳 is charged up to conquer the field in the Men’s Asian Champions Trophy 2024 clash against Pakistan🇵🇰 at 1:15PM. Tune in LIVE on Sony Sports TEN 1 and Sony LIV.
The excitement is building what do you think the final score will… pic.twitter.com/FFPpZUVx2O— Hockey India (@TheHockeyIndia) September 14, 2024
भारत आणि पाकिस्तान हॉकी संघ हे हॉकी इतिहासात १८० वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ६६ वेळा भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे तर पाकिस्तानच्या संघाने ८२ वेळा विजय मिळवला आहे. यामध्ये ३२ सामने अनिर्णयीत राहिले आहेत. आशियाई चॅम्पियनमधील आकडेवारीवर नजर टाकली तर हे दोन्ही संघ ११ वेळा आमनेसानाबे आले आहेत यामधील ७ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे तर २ वेळा पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवला आहे. २ सामने अनिर्णयीत राहिले आहेत. आजच्या सामन्यावर प्रेक्षकांच्या नजारा असणार आहेत.