सलमान अली आगा आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
21 Sep 2025 08:36 PM (IST)
Asia cup super 4 Live Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील सुपर 4 सामन्यात भारताकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण केले जात आहे. पाकिस्तानच्या फरहानचा कुलदीप यादवने झेल सोडला आहे.
21 Sep 2025 08:24 PM (IST)
Asia cup super 4 Live Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील सुपर 4 सामन्यात पाकिस्तानने 3 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 26 धावा केल्या आहेत.
21 Sep 2025 08:18 PM (IST)
Asia cup super 4 Live Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील सुपर 4 चा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानला फखर जमानच्या रूपात पहिला झटका मिळाला आहे.
21 Sep 2025 08:10 PM (IST)
Asia cup super 4 Live Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील सुपर 4 चा सामना सुरू झाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या फरहानला जीवनदान मिळाले आहे. अभिषेकने फरहानचा सोपा झेल सोडला.
21 Sep 2025 08:04 PM (IST)
Asia cup super 4 Live Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मधील सुपर 4 चा सामना खेळला जात आहे. टॉस वेळी दोन्ही संघांनी हस्तांदोलन करण्याचे टाळल्याचे दिसत आहे.
21 Sep 2025 08:00 PM (IST)
India vs Pakistan Live Score : पाकिस्तान संघाने खुशदिल शाहच्या ऐवजी हुसेन तलत तर हसन नवाज ऐवजी फहिम अश्रफला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.
21 Sep 2025 07:51 PM (IST)
India vs Pakistan Live Score : भारतीय संघाने अंतिम ११ मध्ये बदल केला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी वरुण चक्रवर्ती तर हर्षित राणाच्या ऐवजी जसप्रीत बुमराहला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे. हे दोन बदल भारतीय संघात करण्यात आले आहेत.
21 Sep 2025 07:38 PM (IST)
India vs Pakistan Live Score :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
21 Sep 2025 06:56 PM (IST)
India vs Pakistan Live Score : आशिया कप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सुपर ४ सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.
India vs Pakistan Live Score : आज २१ सप्टेंबर आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा दोन संघात सामना खेळवण्यात येणार आहे. गट टप्प्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. या समान्यांनंतर आता सुपर ४ सामन्यात हे दोन्ही पक्ष समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचा बदला काढण्यास प्रयत्नशील असणार आहे, तर भारतीय संघ सलग विजय मिळवण्यासाठी उत्सुक असणार आहे. गट टप्प्यात भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. आता देखील भारतीय क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाकडून अशाच खेळाची यापेक्ष असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बलाढ्य दिसून येत आहे तर सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ भारतीय संघाच्या तुलनेत खुपच दुबळा दिसून येत आहे. त्यामुळे सुपर ४ मधील हा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.