इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; पॅलेस्टिनी परतत आहेत गाझाला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Gaza news in marathi : इस्रायलच्या गाझातील (Gaza) कारवाई दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. या कारवायांमुळे गाझातील पॅलेस्टिनींच्या मृतांची संख्या ६५ हजार पेक्षा जास्त झाली आहे. शनिवारी (२० सप्टेंबर) गाझातील आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) सुरु आहे. तेव्हापासून आतापर्यंत युद्धात ६५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा बळी गेला आहे. तर १ लाखाहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
गेल्या २४ तासांत इस्रायलने तीव्र हल्ले केले असून या हल्ल्यात ३४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० लोक जखमी झाले आहेत. शिवाय उपासमारीचा देखील सामाना लोकांना करावा लागला आहे. यामुळे अनेक महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिका आणि इस्रायलच्या गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशन २७ मे पासून पॅलेस्टिनी लोकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवत आहे, मात्र परिस्थिती इतकी बिकट आहे की आतापर्यंत उपासमारीमुळे २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्य झाला आहे.
इस्रायलच्या संरक्षण दलाने शनिवारी गाझाच्या दक्षिणेकडे जमीनी मार्गे कारवाई सुरु केले असल्याचे म्हटले आहे. यावेळी हमासच्या अनेक ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आले असल्याचे सैन्याने म्हटले आहे. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील खान युनूस आणि रफाह शहरात अजूनही हमासचे लोक आहे. यामुळे गेल्या २४ तासांत या भागांमध्ये इस्रायलने कारवाईला वेग दिला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहे. हमासच्या सैनिकांना ठार करण्यात येते असल्याचा दावा IDFने केला आहे.
गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने गाझातील उंच इमारती पाडण्यासही सुरुवात केली आहे. आता पर्यंत २० इमारती ढेर करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या सततच्या कारवायांमुळे पाच लाखाहून अधिक लोकांनी गाझा सोडले आहे. मात्र हा दावा हमासने फेटाळला आहे. केवळ तीन लाख गाझा सोडून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इस्रायलच्या कारवाईमुळे अजूनही ९ लाख लोक गाझात अडकले असल्याचे म्हटले आहे.
याच वेळी इस्रायलवर जागतिक स्तरावर निषेध केला जात आहे. अनेक देशांनी इस्रायलच्या कावायांना बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच इस्रायलवर आतंरराष्ट्रीय कायद्यांच्या उल्लंघनाचा आणि मानवी गुन्ह्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये कधीपासून सुरु आहे युद्ध?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले होते. आता या युद्धाला दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे.
गाझातील सद्य परिस्थिती काय आहे?
गाझात इस्रायलच्या हमासविरोधी कारवाया सुरुच आहेत. मात्र यामुळे ६५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक उपासमारीने मरत आहेत. अनेकांना गाझा सोडले आहे.
Israel Hamas War : इस्रायलच्या हमासविरोधी कारवायांना वेग; गाझातील हवाई हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू






