सलमान आगा आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK : आज २१ सप्टेंबर आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा दोन संघात सामना खेळला जाणार आहे. गट टप्प्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला होता. या समान्यांनंतर भारतीय संघाकडून हस्तांदोलन करण्याचे टाळण्यात आले होते. त्यामुळे मोठा गदारोळ उठला होता. त्यामुळे सुपर ४ च्या आजच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या
पहिल्या सामन्यानंतर, भारतीय संघ थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पोहचला होता. त्यांनी पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणे टाळले होते. तर पाकिस्तानी खेळाडू मैदानावर वाट पाहत राहिले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या घटनेबाबत आक्षेप घेत आयसीसीकडे तक्रार नोंदवली होती आणि भारतावर खेळाच्या भावनेचे उल्लंघन करण्याचा ठपका लावला होता.
काश्मीरमध्ये झालेल्या पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता, जो क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसून आला. आयसीसीकडून पाकिस्तानने दाखल केलेली तक्रार गैरसमज म्हणून फेटाळून लावली होती. असे करून देखील पाकिस्तान क्रिकेट शांत बसले नाही आणि त्यांनी मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी देखील केली होती. शेवटी, रेफरींना त्यांच्या पदावर राहण्याची परवानगी कायम राखण्यात आली. विशेष म्हणजे आज होणाऱ्या सामन्यादरम्यान अँडी पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवकडून वाद बाजूला ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. तो म्हणाला होता की, “हा बॅट आणि बॉलमधील खेळ असून आवाजाकडे दुर्लक्ष करा आणि सामन्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.” तसेच त्याने खेळाडूंना बाहेरील गोष्टींमुळे विचलित होण्यापासून दूर राहण्याचे आणि मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.