सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा(फोटो-सोशल मीडिया)
India vs Pakistan Super Four Match: आशिया कप २०२५ चा गट टप्पा संपला असून आता सुपर ४ सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिला सुपर ४ सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला ४ विकेट्सने पराभूत केले आहे. तर आज सुपर ४ मधील दूसरा सामाना भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे महत्वपूर्ण असणार आहे.
भारतीय संघाने अंतिम ११ मध्ये बदल केला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी वरुण चक्रवर्ती तर हर्षित राणाच्या ऐवजी जसप्रीत बुमराहला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे. हे दोन बदल भारताकडून करण्यात आले आहेत. तर पाकिस्तान संघाने खुशदिल शाहच्या ऐवजी हुसेन तलट तर हसन नवाज ऐवजी फहिम अश्रफला अंतिम ११ मध्ये स्थान दिले आहे.
हेही वाचा : Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे महामुकाबला खेळला जाणार आहे. दुबईमध्ये वातावरण सामन्यासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाही. युएईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरी तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होणार आहे.
क्रिकबझच्या मते, भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर ४ सामना हा मध्यवर्ती खेळपट्टीवर खेळला जाणार आहे. जिथे दोन्ही बाजूंना समान सीमा असणार आहेत. ही खेळपट्टी कोरडी आणि संथ असेल, ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय फिरकीपटू या मैदानावर पाकिस्तानच्या फलंदाजावर वर्चस्व गाजवू शकतात.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलट, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद, फहिम अश्रफ.
बातमी अपडेट होत आहे…