भारत वि पाकिस्तान सामना(फोटो-सोशल मीडिया)
India vs Pakistan Super Four : आशिया कप २०२५ चा(Asia cup 2025) गट टप्पा संपला असून आता सुपर ४ सामने खेळवले जात आहे. पहिला सुपर ४ सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेश संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. आज सुपर ४ मधील दूसरा सामाना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK )यांच्यात खेळला जाणार आहे. आजचा सामाना हा महामुकाबला असणार आहे. हा रोमांचक सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुबईमध्ये वातावरण सामन्यासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाही. परंतु, जर सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली तर काय होणार? पावसामुळे जर सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला लॉटरी लागणार याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने रचला इतिहास! मोडला शाकिब अल हसनचा विक्रम; T20 मध्ये केला ‘हा’ पराक्रम
भारताने गट टप्प्यात गट अ मध्ये अव्वल स्थान कायम ठेवून सुपर फोरसाठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहून या टप्प्यात पोहोचला आहे. तथापि, सामना रद्द केल्याने भारतीय संघाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. नियमांनुसार, अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे महामुकाबला होणार आहे. या सामन्या दरम्यान घाबरण्याची गरज नाही. सध्या यूएईमध्ये पावसाची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना आता नियमांची ओळख देखील झाली आहे. युएईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरी तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांकयातील सामना हा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होण्याची जास्तीतजास्त शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.