(फोटो सौजन्य: Pinterest)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच नाही तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठीही ओळखले जातात. वयाच्या ७५ व्या वर्षाही त्यांचा हा फिटनेस आणि कधीही न संपणारा उत्साह अनेकांना लाजवणारा आहे. दिवसभराती आपली अनेक कामे केल्यानंतरही ते थकत कसे नाहीत असा प्रश्न अनेकांना पडतो. याचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत. मोदींच्या फीट राहण्यामागे काटेकोरपणे पाळली जाणारी त्यांची जीवनशैली आहे. रोजच्या जीवनात काही हेल्दी हॅबाट्सचे पालन करुन ते स्वत:ला तंदूरुस्त ठेवतात. या सवयी आपणही जर आपल्या रोजच्या जीवनात अंगीकरल्या तर आपण दिर्घकाळ अनेक आजारांना आपल्यापासून दूर करु शकतो आणि वृद्धत्वातही स्वत:ला मजबूत आणि उत्साही बनवून ठेवू शकतो. चला त्या कोणत्या सवयी आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
पहाटे उठण्याची आणि व्यायामाची सवय
नरेंद्र मोदींच तंदुरुस्त राहण्यामागचं सर्वात मोठ आणि मूळ कारण म्हणजे त्यांची पहाचे उठण्याची सवय. लवकर झोपणे, लवकर उठणे ही सवय आयुष्यभर जपल्यास आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात व्यायामाने करावी, यासाठी तुम्ही योगासन, प्राणायम आणि सूर्यनमस्कार करु शकता. तुम्ही सकाळी उठून ध्यानधारणाही करु शकता, यामुळे दिवसभर शरीर उत्साही ठेवण्यास मदत होते. मोकळ्या हवेत प्राणायम आणि योगधारणा केल्याने शरीराला शुद्ध ऑक्सिजनही मिळतं.
सात्त्विक आणि साधा आहार
आजकाल अनेकजण घरातलं जेवण कमी आणि बाहेरचं तेलकट जंक फूड जास्त खाऊ लागले आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. नरेद्र मोदी यांचा आहार साधा, सात्विक आणि पोषकतत्वांनी भरलेला असतो. खिचडी, मोड आलेले धान्य, डाळी, भाज्या, ताक, हंगामी फळं अशा पदार्थांचा त्यांचा आहारत प्रामुख्याने समावेश केला जातो. शेवग्याच्या शेंगा त्यांना विशेष करुन खायला फार आवडतात. या शेंगांमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्वांचा भरपूर साठा आढळला जातो, जे ऊर्जा आणि ताकद देण्यास मदत करतात.
कोमट पाणी पिण्याची सवय
कोणताही ऋतू असो नरेंद्र मादी नेहमीच आपल्या आहारात वर्षभर कोमट पाण्याचे सेवन करतात. कोमट पाणी पिल्याने पचनसंस्था नीट, राहते आणि शरीरातील विषारी घटक शराराबाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
उपवासही तितकाच महत्त्वाचा
धार्मिक कारणामुळे केला जाणारा उपवास आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचा ठरतो. उपवास केल्याने शरीर हलकं होत आणि भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. उपवासामध्ये मन एकाग्र करता येते आणि आपल्या आत्मशिस्त लागते.
नरेंद्र मोदींचे आवडते फूड कोणते?
शेवग्याच्या शेंगा, खिचडी, श्रीखंड, ढोकळा, लिट्टी चोखा हे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत.
नरेंद्र मोदी रोज काय खातात?
मखाना एक असा पदार्थ आहे ज्याचे सेवन नरेंद्र मोदी रोज करतात. हे सुपरफूड हलके, कुरकुरीत आणि आरोग्यदायी फायद्यांनी परिपूर्ण आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.