'जड्डू हे फक्त नाव नसून एक ब्रँड आहे..'; पुष्पाच्या स्टाइलमधील जडेजाच्या एन्ट्रीपुढे अल्लू अर्जुनही फिका..(फोटो-सोशल मीडिया)
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL साठी आपापल्या संघात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आपल्या खेळाडूंचा प्रवेश भव्य व्हावा यासाठी आयपीएल फ्रँचायझी विविध प्रयोग करताना दिसून येत आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या एन्ट्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पुष्पा भाऊंच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनही त्यापुढे फिका वाटायला लगाला आहे.
रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा होऊ लागली होती. मात्र, या सर्व अफवा होत्या, असे काहीही झाले नसले तरी त्याने आपली शानदार कामगिरी कायम ठेवली. ट्रॉफी जिंकल्यानंतर तसेच जडेजाने आता आयपीएल खेळण्याची तयारी सुरू केली आहे. ज्यासाठी जाडेजाने पुष्पा स्टाईलमध्ये सीएसकेच्या शिबिरात एंट्री केली आहे.
रवींद्र जडेजा त्याच्या राजेशाही थाटासाठी प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत त्याने सीएसकेच्या कॅम्पमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश केला आहे, तोही राजेशाही असाच आहे. त्याच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चेन्नईने शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या खूप व्हेरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जडेजा ‘जड्डू हे फक्त नाव नसून एक ब्रँड आहे’ असे म्हणताना ऐकू येतअ आहे.
हेही वाचा : Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक नाहीच; ‘हे’ कारण आलं समोर..
जड्डूचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच भावलेला दिसून येत आहे. त्याच्या एन्ट्रीचे सर्वांनाच वेड लागले आहे. पुष्पा स्टाईलमध्ये जाडेजाने ज्या पद्धतीने पाठीवर थाप मारली तेही अप्रतिम असेच होते. तसेच, सोबत लावलेले संगीत त्याच्या प्रवेशाला अगदी अनुकूल होते.
रवींद्र जडेजा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र एकदिवसीयमधून निवृत्तीच्या वृत्ताला पूर्णविराम देत जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यात त्याने सांगितले की सध्या त्याचा निवृत्तीचा कोणताही विचार नाही.
20 फेब्रुवारीपासून सुरू झालेले सीएसकेचे प्रशिक्षण शिबिर बीसीसीआयच्या सूचनेनुसार चेपॉक स्टेडियमवरून सीएसके अकादमीमध्ये हलवण्यात आले आहे. एमएस धोनी, आर अश्विन, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि इतर वरिष्ठ खेळाडू या शिबिरात आधीच सहभागी झाले आहेत. दुबईहून परतल्यानंतर जडेजा देखील आता आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाला आहे.
हेही वाचा : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचे अखेर ठरले! KL Rahul नाही, तर ‘या’ बड्या खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा!
रुतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मथिशा पाथीराना, एमएस धोनी (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, खलील अहमद, सॅम कुरन, शेखर चक्कू, विजय शंकर, शेखर, शेख, मुजरा, शेखर, मुजरा, मुजरा ईट सिंग, नॅथन एलिस, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, जेमी ओव्हरटन.