IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचे अखेर ठरले! KL Rahul नाही, तर 'या' बड्या खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा!(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार संपला असून आता आयपीएलचा थरार रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तसेच आता देशात T20 IPL 2025 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत 10 संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधार घोषित केलेला नाही. पण केएल राहुलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता होती, अशी चर्चा होती, मात्र राहुलने कर्णधारपद नाकारले आहे.
केएल राहुल हा याआधी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होता, परंतु लिलावापूर्वी एलएसजीने त्याला कर्णधारपदी कायम ठेवले नाही आणि त्याला लिलावात विकतही घेतले नाही. त्यानंतर दिल्लीने राहुलवर बाजी लावली. अशा परिस्थितीत आता राहुल दिल्लीचा कर्णधार होईल असे वाटत असतान, मात्र आता राहुलने डीसीचे कर्णधारपद नाकारल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर आता अष्टपैलू अक्षर पटेलकडे संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Champion Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची विजयी मिरवणूक नाहीच; ‘हे’ कारण आलं समोर..
अक्षर पटेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत तो आता आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचे कर्णधारपद भूषवताना दिसणार असल्याची चर्चा आहे. या आयपीएलमध्ये त्याने काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, संपूर्ण हंगामात त्याने कधीही कर्णधारपद भूषवलेले नाही.
आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, अक्षर पटेलला लवकरच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. आयएएनएसच्या हवाल्याने सूत्रांनी सांगितले की, केएल राहुलला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याने ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलला कर्णधार पदी बढती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केएल राहुलच्या पाठीशी आयपीएलमध्ये दोन संघांचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. त्याने 2020 आणि 2021 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. परंतु, दोन्ही हंगामात पंजाबला गुणतालिकेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्याच वेळी, 2022-2024 पर्यंत, त्याने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ची जबाबदारी स्वीकारली आणि संघाला दोनदा प्लेऑफमध्ये पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली. पण आता त्याने दिल्लीचे कर्णधारपद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : कसोटी क्रिकेटसाठी 2027 हे वर्ष असणार खास! ऑस्ट्रेलिया-इंग्लंडने केली मोठी घोषणा, वाचा सविस्तर
अक्षर पटेल सध्या भारतीय T20 संघाचा उपकर्णधार आहे. आयपीएल 2024 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे काही सामन्यात नेतृत्व करताना दिसला होता. स्लो ओव्हर रेटमुळे ऋषभ पंतला गेल्या मोसमात सामन्यातून बंदीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी तो दिल्लीचा कर्णधार झाला. अक्षरने त्याच्या 150 सामन्यांच्या आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत 1,653 धावा केल्या आहेत आणि 123 विकेट्स मिळवल्या आहेत.