फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या मालिकेचा पहिला सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने यामध्ये सूर्यकुमार यादवचे नेतृत्वाखाली 61 धावांनी पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह भारताच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामना जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या युवा संघाचा नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. मागील सामन्यापासून संजू सॅमसंगने त्याच्या दमदार फॉर्म दाखवत पुन्हा एकदा दुसऱ्यांदा शतक झळकावला आहे.
A clinical bowling display by #TeamIndia in Durban👌👌
South Africa all out for 141.
India win the 1st #SAvIND T20I by 61 runs and take a 1-0 lead in the series 👏👏
Scorecard – https://t.co/0NYhIHEpq0 pic.twitter.com/36MRC63RHD
— BCCI (@BCCI) November 8, 2024
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत टीम इंडियाने 202 धावा केल्या आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला हे लक्ष्य पूर्ण करता आले नाही. भारताच्या संघाने 61 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी दमदार सुरुवात भारताला करून दिली. परंतु अभिषेक शर्माने स्वतःचा विकेट लवकर गमावला. तर दुसरीकडे संजू सॅमसनने कमालीची फलंदाजी करत 107 धावांची खेळी खेळली. सॅमसनने 50 चेंडूंमध्ये 107 धावा केल्या आणि यामध्ये त्याने सात चौकार आणि 10 षटकार देखील मारले. भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात महत्त्वाचे योगदान केले. तर तिलक वर्माने 33 धावांची चांगली खेळी खेळून दाखवली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सुद्धा 21 धावांची खेळी खेळली.
हेदेखील वाचा – IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहू शकतो?
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा संघ 17.5 षटकांमध्ये गारद केला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कालच्या सामन्यांमध्ये त्यांची जादू दाखवली. यामध्ये वरून चक्रवर्तीने चार ओव्हर टाकत तीन विकेट्स नावावर केले तर रवी बिश्नोईने देखील चार विकेट्स घेतले आहेत. आवेश खानच्या हाती एक विकेट लागली तर अर्शदीप सिंहने सुद्धा १ विकेट संघासाठी घेतली.
मागील सामन्यात म्हणजेच बांग्लादेश विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारताच्या संघासाठी संजू सॅमसनने कमालीची फलंदाजी केली होती. या सामन्यात शतक ठोकून त्याने भारतासाठी सलग दुसरे शतक नावावर केले आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून संजू सॅमसनला संघामध्ये स्थान मिळत नव्हते. आता संघामध्ये स्थान मिलाळाल्यानंतर त्याने संधीचे सोने करून दाखवले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील दुसरा सामना १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याचे आयोजन सेंट जॉर्ज ओव्हल स्टेडियमवर करण्यात आले आहे.