भारतीय क्रिकेट टीम(फोटो-सोशल मिडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यावेळी आशिया कप हा टी-२० स्वरूपात खेळला जाणार आहे. आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघ सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ असून या स्वरूपात एका भारतीय गोलंदाजाने एका सामन्यात ५ बळी घेण्याची जादुई कामगिरी केली आहे. आशिया कपच्या ८ सप्टेंबर २०२२ रोजी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अफगाणनिस्तान संघाविरुद्ध भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ही केली होती. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती.
अफगाणनिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यात भारताने शानदार फलंदाजी केली होती. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या जोडीने मैदानात येऊन १२.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली होती. केएल राहुल ४१ चेंडूंतचा सामना करत ६२ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ६ चौकार लगावले होते. यानंतर विराट कोहलीने डाव सांभाळला आणि शतक ठोकले होते. ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले होते. विराटने त्याने ऋषभ पंतसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या होत्या.
हेही वाचा : ‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?
विरोधी संघाकडून विकेट घेणारा फरहिद अहमद हा एकमेव गोलंदाज ठरला होता, ज्याने चार षटकांत दोन विकेट घेतल्या होत्या. तथापि, या दरम्यान त्याने ५७ धावा मोजल्या होत्या. प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने केवळ नऊ धावांत आपल्या चार विकेट्स गामावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्या चार विकेट काढल्या होत्या.
भुवनेश्वर कुमारने या सामन्याच्या चौथ्या चेंडूवर हजरतुल्लाह झझाई (०) ला एलबीडब्ल्यू बाद करत, त्यानंतर सहाव्या चेंडूवर गुरबाजला शून्यावर बाद केले होते. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भुवीने करीम जनत (२) ला विराट कोहलीकरववी झेलबाद केले, तर सहाव्या चेंडूवर त्याने नजीबुल्लाह झदरान (०) ला एलबीडब्ल्यू बाद केले. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने अजमतुल्लाह उमरझाई (१) ला कार्तिकरवी झेलबाद केले होते.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या इब्राहिम झदरानने एका टोक सांभाळले होते. परंतु, दुसऱ्या टोकावर कोणताही फलंदाज मैदान्त टिकू शकला नाही. निर्धारित २० षटकात ८ विकेट गमावल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ केवळ १११ धावाच करू शकला होता. झदरानने ५९ चेंडूत दोन षटकार आणि चार चौकारांसह ६४ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा : The Hundred : इंग्लिश खेळाडूने मोडला फाफ डूप्लेसीचा रेकाॅर्ड! धोनी – कोहलीने टाकलं मागे
भारताकडून भुवनेश्वर कुमारने चार षटकांत फक्त चार धावा देत पाच बळी टिपले होते. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकला होता. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती. भारताने हा सामना १०१ धावांनी आपल्या नावावर केला होता.