 
        
        स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल(फोटो-सोशल मीडिया)
Palash Muchhal-Smriti Mandhana Marriage : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मानधना सध्या आयसीसी महिला विश्वचषकात आपल्या कामगिरीने धुमाकूळ घालत आहे. स्मृती मानधना केवळ मैदानातील तिच्या फटकेबाजीनेच नाही तर तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी देखील ओळखली जाते. तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावरील तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये अनेक वेळा ट्रेंड होताना दिसतो. दरम्यान, स्मृती मानधना आता पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. त्याचे कारण म्हणजे ती लग्न करणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS toss update : अरेरे…भारताने आणखी एकदा टाॅस गमावला! टीम इंडिया पहिले करणार फलंदाजी
एका वृत्तानुसार, स्मृती मानधना लवकरच तिचा प्रियकर, गायक-अभिनेता-दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे. हे दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून सोशल मीडियावर त्यांच्या गोंडस फोटोंनी अनेकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांच्या फोटोवर चाहत्यांचे प्रेम देखील मिळत आले आहे.
काही काळापूर्वी, पलाश मुच्छलने स्वतः एका मुलाखतीत दुजोरा दिला होता की, ते लवकरच स्मृती मानधनाला इंदूरची सून बनवतील. आता, टाईम्स एंटरटेनमेंटच्या वृत्तानुसार, हे जोडपे २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जे स्मृतीचे मूळ गाव आहे. तथापि, या जोडप्याकडून अद्याप अधिकृतपणे लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
स्मृती आणि पलाशची प्रेमकहाणी २०१९ मध्ये सुरू झाली आहे. २०२४ मध्ये या नात्याची अधिकृत माहिती देण्यापूर्वी त्यांनी त्यांचे नाते पाच वर्षे सर्वांपासून गुप्त ठेवले होते. आता, हे जोडपे अखेर लग्न करत असल्याचे समोर आले आहे. स्मृती मानधना सध्या ५० षटकांच्या महिला विश्वचषकात खेळत आहे. ३० ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयाने भारत अंतिम फेरीत पोहचला आहे. या सामन्यात मानधना २४ धावांवर ती बाद झाली होती. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात पलाश आणि त्याचे चाहते तिला प्रोत्साहन देतील.
पलाश हा प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. तो एक गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक देखील आहे. त्याने त्याच्या वयाच्या १८ व्या वर्षी त्याचे पहिले गाणे तयार केले होते, ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक ठरला आहे. त्यांनी राजपाल यादव आणि रुबिना दिलाइक यांच्या “अर्ध” या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले, ज्याचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक करण्यात आले.






