राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक जिंकून देणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही सध्या दुखापतग्रस्थ झाली आहे. भारतीय बॅडमिंटन विश्वातील आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिला दुखापत झाल्यामुळे आगामी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेला ती मुकणार आहे. २०१९ साली नोजोमी ओकुहाराला मात देत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप (badminton world championship) जिंकणारी पीव्ही सिंधू यंदाच्या वर्षी स्पर्धेबाहेर गेल्याने भारताला याचा मोठा तोटा होणार आहे.
पीव्ही सिंधूने आतापर्यंत केलेल्या दमदार कामगिरीमुळे तसेच २०१९ साली मिळवलेल्या जेतेपदामुळे तिला बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ओळखले जाते. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ मध्ये सिंधूने महिला एकेरीत सुवर्णपदक मिळवले असून ती चांगल्या फॉर्ममध्ये होती अशात ती बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही जिंकू शकली असती. परंतु दुखापतीमुळे आता ती स्पर्धेलाच मुकणार आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून सिंधू बाहेर गेल्यानंतर तिचे वडिल पीवी रम्मना यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले सिंगापुर ओपन आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर सिंधू दुखापतीमुळे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपला मुकणं हे अत्यंत निराशाजनक आहे.