भारतीय महिला क्रिकेट संघ(फोटो-सोशल मिडिया)
INDW vs SAW: भारतीय महिला संघाने मंगळवारी तिरंगी मालिकेत आपला दबदबा कायम राखला आहे. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी पराभव करून लागोपाठ दुसरा विजय नोंदवला आहे. या सामन्यात भारतीय संघाने १५ धावांनी विजय आपल्या नावे केला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा विकेटच्या मोबदल्यात २७६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४९.२ षटकांत २६१ धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, प्रतिका रावलने ९१ चेंडूत ७८ धावांची चमकदार खेळी केली, ज्यामध्ये तिने सात चौकार आणि एक षटकार लगावला आहे. या सामन्यात प्रतीका व्यतिरिक्त इतर कोणताही भारतीय खेळाडू ५० च्या वर धावा करू शकला नाही. तथापि, यानंतरही भारतीय संघाने ५० षटकांत ६ गडी गमावून २७६ धावा उभ्या केल्या.
हेही वाचा : IPL २०२५ : ऑस्ट्रेलियन पॉडकास्टरने IPL चे व्हिडिओ हटवले, BCCI कडून कायदेशीर पत्र..,नेमकं प्रकरण काय?
भारताची दुसरी सलामीवीर स्मृती मानधनाने ५४ चेंडूचा सामना करत ३६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ४८ चेंडूमध्ये ४१ धावांची खेळी केली, परंतु तिला अर्धशतक मात्र करता आले नाही. तर, जेमिमा रॉड्रिग्जने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या आणि रिचा घोषने १४ चेंडूत २४ धावांची छोटेखानी पण महत्वाची खेळी केली. ज्यामुळे भारताला शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा काढण्यास मोठी मदत झाली.
२७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. त्यांचा संघ केवळ ४९.२ षटकांतच पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दक्षिण आफ्रिकेचा संघ २६१ धावांवरच सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी केलेली दिसून आली. दक्षिण आफ्रिकेसाठी ताजमिन ब्रिट्सने १०९ धावांची खेळी केली परंतु, तीची झुंज अपयशी ठरली. तिने १०७ चेंडूचा सामना करत १०९ धावा केल्या. त्यात तिने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले.
हेही वाचा : पृथ्वी शॉला आयपीएल 2025 ने नाकारले आता या लीगमध्ये दिसणार खेळताना, सूर्या, अय्यरची नावे देखील समाविष्ट
त्याच वेळी, भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये सामना आपल्या बाजूला फिरवला. स्नेह राणाने भारतासाठी दार उघडले आहे. तिने शानदार गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचे पाच फलंदाजांना माघारी पाठवून कंबरडे मोडून टाकले. तर अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारतीय महिला क्रिकेट संघाने या स्पर्धेत यापूर्वी श्रीलंकेला ९ विकेट्सने दणदणीत पराभूत करण्यात यश मिळवले होते. पावसामुळे हा सामना कमी षटकांचा करण्यात आला होता.