नवी दिल्ली : आज डेव्हीड वॉर्नरला जोरदार बॅटींग करून संघाला विजयाकडे नेणे गरजेचे असताना, कर्णधार अपयशी ठरला. पहिला झटका दिल्लीच्या संघाला लागला असला तरी, पिलिप सॉल्ट आणि मॅचेल मार्श यांची चांगली जोडी जमली आहे. फिलिप सॉल्ट 23 धावांवर खेळत आहे. तर मॅचेल मार्श 10 धावांवर खेळत आहे. फिलिप सॉल्ट आणि मॅचेल मार्शची शानदार भागीदारी दिल्ली कॅपिटल्सला संजीवनी देऊ शकते, ही जोडी पुढे टिकली तर दिल्लीसाठी विजयाची शक्यता असणार आहे.
आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात आज अरुण जेटली मैदानावर सामना सुरू असताना, सनरायझर्सने पहिली बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, सनरायझर्सने 2 विकेट गमावला तरी पॉवर प्लेमध्ये 70 धावा केल्या आहेत.
Match 40. WICKET! 9.4: Harry Brook 0(2) ct Axar Patel b Mitchell Marsh, Sunrisers Hyderabad 83/4 https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL #DCvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
अभिषेक शर्माच्या शानदार खेळीने सनरायझर्सने पॉवर प्लेमध्येच चांगली धावसंख्या उभारली आहे. अभिषेक शर्मा सध्या 52 धावांवर खेळत आहे.
A 25-ball FIFTY for Abhishek Sharma 😎
He brings his half-century with a maximum as #SRH reach 76/2 after 8 overs 👌🏻👌🏻
Follow the match ▶️ https://t.co/iOYYyw2zca #TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/bhiUPdZYAK
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
दिल्लीच्या खेळपट्टीचा अहवाल :
दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानाच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ही खेळपट्टी आजपर्यंत कोणालाही समजलेली नाही. या खेळपट्टीवर कधी काय होईल हे कोणालाच माहीत नाही. दिल्लीतील खेळपट्टी खूप संथ खेळते. स्पिनर्सना येथे खूप मदत मिळते. दोन्ही संघांपैकी एकाने अतिरिक्त फिरकीपटू खेळवल्यास आश्चर्य वाटणार नाही. मैदान लहान असल्याने येथे धावाही होतात. चौकार आणि षटकारांचाही जोरदार पाऊस पडतो. अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीची उसळी सर्वांच्या समजण्यापलीकडची असली तरी. कधी कधी इतका उसळतो की चेंडू कीपरलाही मारतो. त्यामुळे काही वेळा चेंडू इतका खाली राहतो की फलंदाजाला तो खेळणे जवळपास अशक्य होते. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू शकतो.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (क), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, मुकेश कुमार
सनरायझर्स हैद्राबाद : मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (क), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, अकेल होसेन, उमरान मलिक