फोटो सौजन्य - Gujarat Titans
गुजरात टायटन्स : गुजरात टायटन्सचा संघाने आयपीएल २०२५ मध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वात या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. या सीझनमध्ये गुजरात टायटन्सचा संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ८ सामन्यात विजय मिळाला आहे तर ३ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. आता गुजरात टायटन्सचा संघाने आता आयपीएलच्या इतिहासात नाव नोंदवले आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. गुजरात टायटन्सने सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ मध्ये एक अद्भुत विक्रम केला आहे.
या सीझनमध्ये गुजरात टायटन्सची सलामीवीर जोडी शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांची हिट ठरली आहे. साई सुदर्शन हा ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. दमदार फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर संघाचा कर्णधार शुभमन गिल सुद्धा चांगली कामगिरी सातत्याने संघासाठी करत आहे. गुजरात टायटन्सच्या तीन फलंदाजांनी या हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यादाच घडले आहे. याआधी, एकाच फ्रँचायझीच्या दोन खेळाडूंनी ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे असे अनेक वेळा घडले आहे, परंतु गुजरातच्या शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी सर्वांना मागे टाकत एक नवीन विक्रम रचला आहे.
कर्णधार गिलने ११ डावात ५०८ धावा केल्या आहेत तर त्याचा सलामीचा जोडीदार सुदर्शनने ५०९ धावा केल्या आहेत आणि तो स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच वेळी, बटलरने ११ डावांमध्ये ५०० धावा केल्या आहेत आणि या हंगामात तो पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजी कामगिरीमुळे, गुजरात सध्या ११ सामन्यांत १६ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. नेट रन रेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्या मागे आहे.
आयपीएल पुन्हा सुरू होण्यापूर्वी 3 संघांनी केले बदल! मयंक यादव बाहेर, कुशल मेंडिसची झाली एंट्री
या हंगामात गुजरात संघ त्यांच्या शेवटच्या तीन लीग सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सशी खेळणार आहे. संघाला उर्वरित सामने जिंकून टॉप २ मध्ये स्थान मिळवण्याची आशा असेल, ज्यामुळे त्यांना ३ जून रोजी होणाऱ्या आयपीएल फायनलसाठी पात्र ठरण्याच्या दोन संधी मिळतील.
दरम्यान, गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये मोठा धक्का बसेल कारण बटलर आंतरराष्ट्रीय ड्युटीमुळे उपलब्ध राहणार नाही. त्याच्या जागी कुसल मेंडिसची निवड होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या या आंतरराष्ट्रीय खेळाडूने अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळला होता, त्याने पाच डावांमध्ये १६८.२३ च्या स्ट्राईक रेटने १४३ धावा केल्या होत्या.