फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
IPL 2025 points table : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा हा सिझन आता मध्यात आहे. आतापर्यत या सीझनचे ४६ सामने झाले आहेत आणि स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या या संघामध्ये प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. या स्पर्धेमध्ये १० संघ सहभागी झाले आहेत यामध्ये फक्त ४ संघ सेमीफायनलमध्ये खेळणार आहेत. जे संघ पहिल्या टॉप ४ मध्ये असतील त्याला सेमीफायनलचे सामने खेळण्याचा मान मिळणार आहे. सध्या सहा संघामध्ये या प्लेऑफच्या शर्यतीत रस्सीखेच सुरु आहे. सध्या कालच्या दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे, आता कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरूने दिल्लीला घरच्या मैदानावर पराभूत केले. या विजयासह बंगळुरूच्या संघाने पहिले स्थान पॉईंट टेबलमध्ये गाठले आहे. आरसीबीचे आता कालच्या विजयानंतर १४ गुण आहेत सध्या हा एकमेव संघ आज ज्याचे १४ पॉईंट आहे त्यामुळे संघ पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्सचा संघ आहे. गुजरातच्या संघाचे १२ गुण आहेत त्याचबरोबर रनरेट देखील चांगला आहे. तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईच्या संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवून तिसरे स्थान गाठले आहे, संघाचे १२ गुण आहेत.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
– RCB RULING AT THE TOP. 🔥 pic.twitter.com/pqAh2RoTsc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2025
चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे कालच्या पराभवानंतर दिल्लीचा रनरेट कमी झाला आहे त्यामुळे संघाला चौथ्या स्थानावर कालच्या पराभवानंतर समाधान मानावे लागले आहे. पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट यांच्यामध्ये होणार सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे दोन्ही संघाला १-१ गुण देण्यात आला होता. पंजाब किंग्सचा संघ सध्या ११ गुंणासह पाचव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे. लखनौचे १० गुण आहेत. कोलकाता नाईट राइडर्सचा संघ सातव्या स्थानावर आहे.
आठव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे, हैदराबादच्या संघाने फक्त ३ सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट टेबलामध्ये नवव्या स्थानावर आहे. संघाने फक्त २ सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या सीझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघ सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे.