सुनील गावस्कर आणि महेंन्द्रसिंग धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : भारतात आयपीएल २०२५ चा थरार सूरु आहे. आतापर्यंत ५५ सामने खेळवण्यात आले आहेत. प्लेऑफसाठी स्पर्धा रंगली असून पॉइंट टेबलमध्ये देखील मोठा उलटफेर बघायला मिळत आहे. अशातच माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबाबत एक विधान केले आहे. ज्याची चर्चा होऊ लागली आहे. गावस्कर यांनी अनकॅप्ड खेळाडूंच्या नियमातील बदलावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामते धोनीसाठी नियम बदलल्याने क्रिकेटचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आयपीएल २०२५ च्या हंगामा सुरू होण्यापूर्वी, अनकॅप्ड खेळाडू नियम परत आणण्यात आला होता, ज्या अंतर्गत पाच किंवा त्याहून अधिक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येण्याची तरतूद होती. या नियमाच्या आधारे चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी याला ४ कोटी रुपयांना आपल्या संघात कायम ठेवले. आता सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी या नियम बदलावर संताप व्यक्त करताना ते म्हटले आहे की, अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवण्याची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा कमी असायला हवी.
गावस्कर यांनी स्पोर्ट्स स्टारमधील त्यांच्या स्तंभात लिहिले आहे की ‘एवढ्या जास्त किंमतीचा तरुण, अनकॅप्ड खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे’. तसेच ते म्हणाले की, ‘कोणताही खेळाडू यशस्वी होवो अथवा नाही, तो निघून जातो तेव्हा भारतीय क्रिकेट थोडे दुःखी होते. मागील वर्षी लिलावापूर्वी अनकॅप्ड खेळाडू बनलेल्या महेंद्रसिंग धोनीला संघात ठेवण्यासाठी अनकॅप्ड खेळाडूच्या पगारापोटी ४ कोटी रुपये दिले होते.’
गावस्कर पुढे म्हणतात, ‘अचानक करोडपती होणारे अनेक खेळाडू भारावून जातात, प्रथम अचानक मिळालेल्या नशिबाने आणि नंतर ज्या लोकांना ते आवडायचे आणि कदाचित फक्त भेटण्याचे स्वप्न पाहत होते अशा लोकांना भेटण्याची त्याची चिंता. ते बहुतेकदा त्यांच्या राज्यातील टॉप 30 खेळाडूंमध्ये देखील नसतात.’
हेही वाचा : MI vs GT : Gujrat Titans संघासाठी खुशखबर! मुंबईविरुद्ध ‘हा’ तेजतर्रार गोलंदाज करणार पुनरागमन..
तसेच गावस्कर पुढे बलिहितात, ‘गेल्या काही वर्षांत असा कोणताही अनकॅप्ड खेळाडू आठवत नाही ज्याला मोठी रक्कम दिली गेली आहे आणि तो काही चमत्कार करू शकला आहे. पुढील काही वर्षांत त्याच्या अनुभवाने त्यात सुधारणा होती. पण जर तो त्याच स्थानिक लीगमध्ये खेळत असेल, तर सुधारणा होण्याची शक्यता फारशी जास्त उरत नाही.’