फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru
आयपीएलचे उर्वरीत सामने : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ ची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ दिवस म्हणजेच १ आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या मते, सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा सुरू ठेवणे योग्य होणार नाही. देश युद्धात असताना क्रिकेट चालू आहे हे चांगले दिसत नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती सामान्य झाल्यावर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. ८ मे रोजी पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध धर्मशाला येथे सुरु होता हा सामना सुरु असताना थांबण्यात आला आणि सामना रद्दची घोषणा करण्यात आली.
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ५८ सामने खेळले गेले आहेत आणि १६ सामने बाकी आहेत. यामध्ये १२ लीग स्टेज सामने, क्वालिफायर-१, क्वालिफायर-२, एलिमिनेटर आणि अंतिम सामना यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित १६ सामने कोणत्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हैदराबाद आणि अहमदाबादमध्ये अजूनही ३-३ सामने खेळायचे आहेत. तर २-२ सामने बेंगळुरू, लखनौ आणि कोलकाता येथे खेळवले जाणार आहेत. दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि जयपूरच्या मैदानावर प्रत्येकी एक सामना खेळावयचा शिल्लक आहे पण सामन्याचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे त्यामुळे सामान्यांची ठिकाणे बदलू शकते.
एकाना क्रिकेट स्टेडियम (लखनऊ): २ सामने
राजीव गांधी स्टेडियम (हैदराबाद): ३ सामने
अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली): १ सामना
नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद): ३ सामने
एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई): १ सामना
एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बेंगळुरू): 2 सामने
वानखेडे स्टेडियम (मुंबई): १ सामना
सवाई मानसिंग स्टेडियम (जयपूर) : १ सामना
ईडन गार्डन्स (कोलकाता): २ सामने
🚨 News 🚨
The remainder of ongoing #TATAIPL 2025 suspended with immediate effect for one week.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. एलिमिनेटर सामनाही याच मैदानावर होणार होता. १८ व्या सीझनमधील दुसरा क्वालिफायर सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार होता. एवढेच नाही तर अंतिम सामनाही कोलकाता येथे होणार होता. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. अशा परिस्थितीत, या हंगामातील पहिला आणि शेवटचा म्हणजेच अंतिम सामना कोलकाता येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हे पाहणे बाकी आहे की नवीन वेळापत्रकात संघ पूर्वीप्रमाणे या मैदानांवर सामने खेळतात की त्यात काही बदल होतो.