IPL 2025 : 'ते सर्व मानसिकदृष्ट्या..', वीरेंद्र सेहवाग बरळला! एका शोदरम्यान केले वादग्रस्त विधान(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आता पर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत देखील मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. अशातच वीरेंद्र सेहवाग त्याच्या एका वादग्रस्त विधानाने चर्चेत आला आहे. वीरेंद्र सेहवाग नेहमी त्याच्या स्पष्ट बोलेण्याने चर्चेत येत असतो. यावेळी त्यांनी जाट समुदायाबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. सेहवागच्या या विधानानंतर त्याने माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात हिंदीमध्ये समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएलशी संबंधित शोमध्ये त्यांनी जाटांबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याने. वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सेहवाग बोलल्या नुसार, भारतातील प्रत्येक प्रदेशातील जाटांची भाषा ही वेगळी आहे, पण ते सर्व मानसिकदृष्ट्या मंद असल्याचे त्याने म्हटले आहे.
स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलत असताना सेहवाग म्हणाला की, ‘उत्तर प्रदेशातील जाटांची भाषा वेगळी आहे, राजस्थानातील जाटांची भाषा वेगळी आहे. हरियाणातील जाटांची भाषा वेगळी असून ते सर्व डोक्याने मंद आहेत.’ हे वादग्रस्त विधान सेहवागच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या आधी देखील आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंकडून वादग्रस्त विधानं केली गेली आहेत. यापूर्वी इरफान पठाण, नंतर हरभजन सिंग या दिग्गजांनी देखील वादग्रस्त विधानं केली आहेत. ज्यासाठी त्यांना खूप ट्रोल व्हाव लागलं आहे. तर आता आयपीएल 2025 चांगली रंगात येत असताना सेहवागची जीभ घसरली आणि आता त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लगात आहे. तसेच त्याने माफी मागावी असे देखील म्हटले जात आहे.
On air Virendra Sehwag said,
“Uttar Pradesh ke jat ki bhasha alag hain, Rajasthan ke jaat ki bhasha alag, Haryana ke jaat ki bhasha alag hain… lekin dimag se sare paidal hain.”🤣🤣🤣 pic.twitter.com/4USVudfsVV
— Nitish Bharadwaj (@HarUniversity) April 8, 2025
भारताचा माजी तडाखेबंद वीरेंद्र सेहवागने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर त्याच्याकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी रणदीप हुड्डा याला सेहवागकडून माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीरेंद्र सेहवाग स्वतः जाट समुदायातून येत असून देखील त्याने असे विधान केले. हे विधान कुणाला आवडलेले नसून त्याने माफी मागावी असे बोलले जाते आहे.
हेही वाचा : KKR vs LSG : Wd, Wd, Wd…, शार्दुल ठाकूरच्या नावे नकोसा विक्रम, असा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज..
वीरेंद्र सेहवागने भारतासाठी 350 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 17000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. सेहवागने आयपीएलमध्ये 104 सामने खेळले आहेत. त्याने पंजाब आणि दिल्लीकडून आयपीएल सामने खेळेल आहेत. त्यामध्ये त्याने 2728 धावा केल्या आहेत. या दरम्याने त्याने 2 शतके आणि 16 अर्धशतकेही लागावली आहेत.