जोस बटलर(फोटो-सोशल मिडिया)
Jos Buttler hits 13,000 runners-up mark : सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत टी-२० स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दरम्यान, इंग्लंड संघाचा स्टार फलंदाज जोस बटलरने त्याच्या टी-२० कारकिर्दीमध्ये एक मोठा कारनामा केला आहे. १७ जुलै रोजी यॉर्कशायरविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली आहे. या दरम्यान, बटलरने आपल्या बॅटने वादळ निर्माण केल्याचे दिसून आले आहे.
इंग्लंड संघाचा स्फोटक फलंदाज जोस बटलरने यॉर्कशायर संघाविरुद्ध ७७ धावांची धामकेदार खेळी साकारली आहे. या खेळीच्या जोरावर त्याने टी-२० मध्ये एक मोठा मैलाचा दगड पार केला आहे. आता बटलर हा टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच वेळी, जागतिक क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर, या यादीत तो विराट कोहली आणि महान कॅरिबियन फलंदाज क्रिस गेल यांच्या यादीत ७ व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : नायरसाठी भारतीय संघ शेवटचाच ‘करूण’ होणार? मँचेस्टर कसोटीसाठी संघात ‘या’ एकमेव बदलाची शक्यता
यॉर्कशायरविरुद्ध जोस बटलरने ७७ धावांची खेळी कलेची. त्यांनतर तो भारताच्या स्टार फलंदाज किंग विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या १३००० धावांच्या क्लबमध्ये जाऊन सामील झाला आहे. टी२० ब्लास्टमध्ये त्याने यॉर्कशायरविरुद्ध ४६ चेंडूत ७७ धावा फटकावल्या आहेत. त्याच्या खेळीत एकूण ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. बटलरच्या या धमाकेदार खेळीमुळे संघाने विजय देखील प्राप्त केला आहे.
लँकेशायरच्या संघाने १९.५ षटकांत एकूण १७४ धावा केल्या होत्या. बटलर या संघाचा महत्चाचा खेळाडू आहे. दुसरीकडे, यॉर्कशायरचा संघ १५३ धावांमध्ये गारद झाला आहे. या सामन्यात बटलरच्या संघाने २१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह, बटलरने विराट कोहली आणि ख्रिस गेलच्या यादी देखील यावेळी प्रवेश केला आहे. जोस बटलरने त्याच्या ४५७ व्या टी२० सामन्यात १३००० धावांचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा : IND vs ENG सामन्यादरम्यान केलेल्या वर्तनावर आयसीसीने भारतीय फलंदाज आणि इंग्लंड संघाला ठोठावला दंड
इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर हा टी-२० फॉरमॅटमध्ये एक धडाकेबाज फलंदाज मानला जातो. म्हणूनच तो सतत जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीग आयपीएलमध्ये खेळताना दिसून येतो. सध्या तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. बटलरने एकूण ४५७ टी-२० सामने खेळले असून यामध्ये त्याने ३५.७४ च्या सरासरीने एकूण १३०४६ धावा फटकावल्या आहेत. या काळात बटलरने एकूण ८ शतके आणि ९३ अर्धशतकीय डाव खेळले आहेत.