विराट कोहली आणि विप्राज निगम(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs DC : आयपीएल २०२५ सध्या मध्यावर आली असून गुणतालिकेत चढ उतार दिसू लागले आहेत. या हंगामातील २४ वा सामना काल म्हणजे १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली संघाने ६ विकेट्सने विजय संपादन केला. आरसीबी संघाला आपल्या घरच्या मैदनावर आताच नाही तर बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. या सामन्यात देखील बेंगळुरू संघाला खूप संघर्ष करताना दिसून आला. सामन्याच्या चांगल्या सुरुवातीनंतर देखील आरसीबीला मोठ्या धावसंखेपर्यंत पोहचता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने दिल्लीसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. केएल राहुलच्या दमदार अर्धशतकाच्या जोरवार दिल्लीने लक्ष्य सहज पूर्ण केले.
हेही वाचा : IPL 2025 : ऋतुराज गायकवाडच्या जागी Prithvi Shaw ची एंट्री? बदली खेळाडू म्हणून आजमवणार नशीब..
दिल्लीच्या या विजयामागील सर्वात मोठी भूमिका बजावली ती म्हणजे दिल्लीचा २० वर्षीय गोलंदाज विप्राज निगम आणि केएल राहुल या दोन खेळाडूंनी. राहुलने ५३ चेंडूत ९३ धावा केल्या, तर युवा विप्राजने ४ ओव्हरमध्ये केवळ १८ धावा देत २ महत्वाचे गडी टिपले. सामन्याच्या सुरुवातीला बेंगळुरूच्या सलामीवीरांनी जबरदस्त सुरवात केली. फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी ३ षटकांत ५३ धावा केल्या होत्या. मात्र नंतर फिलिप सॉल्ट धाव बाद झाला आणि आरसीबीच्या धावगतीला चाप बसला. एक वेळ आरसीबी मोठ्या धावसंख्येकडे जातील असे वाटत असताना विपराज निगमने या सामन्यात विराट कोहलीची महत्वाची विकेट घेऊन संपूर्ण सामनाच फिरवून टाकला.
बेंगळुरू संघाने सामन्याची सुरुवात दमदार केली. विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट यांनी पहिल्या ४ षटकांत संघाची धावसंख्या ६० पार नेली. मग पाचव्या षटकात विपराज निगमने बेंगळुरूच्या डावावर पूर्णपणे ताबा मिळवला. चौथ्या षटकात विकेट पडल्यानंतर, पाचव्या षटकात विप्राजने बेंगळुरूवर चांगलाच दबाव निर्माण केला. पाचव्या षटकात विप्राजने केवळ २ धावा दिल्या. दोन षटकांनंतर, युवा लेग-स्पिनरने विराट कोहलीची महत्वाची विकेट मिळवून देत सामनाच फिरवून टाकला.
त्यानंतर त्याच्या तिसऱ्या षटकामध्ये, विप्राजने कृणाल पंड्या आणि टिम डेव्हिड सारख्या फलंदाजांना फक्त ४ धावा दिल्या. शेवटी, त्याच्या चौथ्या षटकात आलेल्या विप्राजने कृणाल पंड्यालाही तंबूत परत पाठवले. कृणाल पंड्या बाद झाल्यानंतर बंगळुरूचा रथ खूपच मंदावला. अशाप्रकारे विपराज निगमने बेंगळुरूविरुद्ध चमकदार गोलंदाजी करून दाखवली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका वठवली.