केएल राहुल(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : लोकेश राहुल पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आणि यष्टीरक्षक म्हणून काम करण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मत दिल्ली कॅपिटल्सचे मार्गदर्शक केविन पीटरसन यांनी व्यक्त केले. खेळाच्या सर्वात लहान आंतरराष्ट्रीय स्वरूपात राहुलच्या फलंदाजीवर काही काळापासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, परंतु आयपीएलच्या सध्याच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला आहे. या काळात राहुलने त्याच्या खेळात काही बदल केले आहेत आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
हेही वाचा : DC vs KKR : दिल्लीला कमबॅक करण्याची संधी, अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
राष्ट्रीय संघात यष्टीरक्षक फलंदाज पदासाठी तीव्र स्पर्धा आहे. राहुल व्यतिरिक्त, निवडकर्त्यांकडे ऋषभ पंत, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल आणि इशान किशनसारखे मजबूत पर्याय आहेत. २०२२च्या विश्वचषकापासून राहुल भारताच्या टी-२० संघाचा भाग नाही, परंतु पीटरसनचा असा विश्वास आहे की, त्याने काही उत्कृष्ट फलंदाजीसह त्याच्या पुनरागमनासाठी एक व्यासपीठ तयार केले आहे. तो यष्टिरक्षक-फलंदाजाच्या भूमिकेसाठी सर्वात योग्य आहे.
हेही वाचा : INDW vs SAW: तिरंगी मालिकेत भारतीय महिलांचा दबदबा कायम, दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी उडवला धुव्वा, प्रतिका रावल चमकली..
टी-२० क्रिकेटमध्ये मी केएल (राहुल) ला भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लावेन. मला वाटते की तुमच्याकडे खूप सलामीवीर आहेत. राहुल ज्या पद्धतीने आता खेळत आहे, त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आणि भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून माझी पहिली पसंती असेल. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीव्यतिरिक्त, राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अलीकडील कामगिरीने पीटरसनला खूप प्रभावित केले आहे. राहुल गेल्या वर्षाच्या मध्यापासून शेवटपर्यंत खूप सकारात्मक खेळला आहे.
श्रीलंकेत सध्या तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय महिला संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. मंगळवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने लागोपाठ दुसरा विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने १५ धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा विकेटच्या मोबदल्यात २७६ धावा उभ्या केल्या. यामध्ये प्रतिका रावलने ७८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच भारतीय गोलंदाजांनी देखील टिच्चून मारा करत साऊथ आफ्रिकेला २६१ धावांवरच रोखले. दक्षिण आफ्रिकेचा डाव ४९.२ षटकांत २६१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून स्नेह राणाने दहा ओव्हरमध्ये ४३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.