फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे. हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयपीएल २०२५ सीजनमध्ये भिडणार आहेत. आजचा सामन्यात नाणेफेक जिंकून अक्षर पटेलने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यांमध्ये आरसीबी विरुद्ध दिल्लीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे आज संघ विजयाच्याच उद्देशाने मैदानात उतरेल. कोलकाता नाईट रायडर्स मागील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे आज त्यांना पुन्हा प्लेऑफ टिकून राहण्यासाठी लढावे लागणार आहे. आज जर कोलकाता नाईट रायडर्स संघ पराभूत झाला तर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल.
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघानी कोणतेही बदल केले नाही, मागील सामन्यात असलेले खेळाडू दोन्ही संघासाठी खेळणार आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात अजिंक्य रहाणे त्याचबरोबर सुनील नारायणच्या फलंदाजीवर चाहत्याची नजर असणार आहे. संघाने आतापर्यत फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी नाही त्यामुळे सातत्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अजिंक्य रहाणेने कमालीचा खेळ दाखवला आहे पण त्याला संघाची साथ मिळाली नाही. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांसारखे घातक गोलंदाज आहेत.
🚨 Toss 🚨 @DelhiCapitals won the toss and elected to bowl against @KKRiders
Updates ▶ https://t.co/saNudbWINr #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/VDNUH29eTK
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
मागील सामन्यांमध्ये फाफ डुप्लेसी याचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे त्याचबरोबर त्याने चांगला धावाही मागील सामन्यात केल्या होत्या. अभिषेक पोरेलने मागील सामन्यात संघाला चांगले सुरुवात करून दिली होती पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याचबरोबर करूण नायर आयपीएल २०२५ मधील पहिला सामन्यात दमदार खेळले होते त्यानंतर त्याचा बॅटमधून धावा आलेल्या नाहीत त्यामुळे तो आज कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. ट्रिस्टन स्टॅब्स मध्यात फलंदाजी करतो आणि एवढेच नव्हे तर तो वेगाने देखील धावा करतो त्यामुळे शेवटचा काही ओव्हर मध्ये दिली का बेटांचा मोठा फायदा झाला आहे.
अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, फाफ डू प्लेसिस, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मुकेश शर्मा, कुलदीप यादव, दुशांत चमिरा
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल,अनुकूल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष्ण रघुवंशी.