विराट कोहली – रिंकू सिंह : सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा हंगाम सुरु आहे आणि या हंगामामध्ये दमदार सामने पाहायला मिळत आहेत. नुकताच एक व्हिडीओ कोलकाता नाईट राइडर्सच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहली आणि रिंकू सिंह हे दोघे बॅट वर चर्चा करताना दिसत आहेत. ही संपूर्ण घटना केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी घडली. हा सामना 21 एप्रिल रोजी कोलकातामध्ये दुपारी 3.30 वाजता होणार आहे. याआधी, केकेआरने आरसीबीच्या होम ग्राउंड एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. त्या सामन्यातील विशेष गोष्ट म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंमधील परस्पर आदर. याच सामन्यानंतर आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने आपली एक बॅट केकेआरचा युवा खेळाडू रिंकू सिंगला भेट दिली.
आता याच बॅट संदर्भात चर्चा झाली आहे. KKR फलंदाज रिंकू सिंग आणि विराट कोहली यांच्यात ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एक मनोरंजक संभाषण झाले. हे संभाषण इतके मजेदार होते की थोडे अस्वस्थ वाटू लागले. वास्तविक रिंकू सिंग कोहलीकडे दुसरी बॅट मागत होता. रिंकू सिंगने सांगितले की, आयपीएलदरम्यान स्पिनरविरुद्ध खेळताना बॅट तोडली होती. त्यानंतर आता तो कोहलीकडे नवीन बॅटची मागणी करत आहे. केकेआरच्या कॅमेरामनने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडिओमध्ये रिंकू सिंह कोहलीला सांगताना दिसत आहे की, त्याने आधीची बॅट तोडली आहे. रिंकू कोहलीच्या आणखी दोन बॅट्सकडे पाहत आहे. हे पाहून कोहली थोडासा नाराज होऊन रिंकूला विचारतो की ती बॅट कशी काय फुटली आणि तो त्याची दुसरी बॅट मागत आहे. उत्तर देण्यापूर्वीच कोहली गंमतीने रिंकूला सांगतो की, जर त्याने दोन सामन्यांमध्ये रिंकूला दोन बॅट दिल्या तर स्पर्धेच्या भविष्यातील सामन्यांमध्ये त्याला अडचणी येऊ शकतात.
“Virat bhai ne ek bat diya thha… jo bat diya thha, woh mere se toot gaya” ? pic.twitter.com/qoJWWs2fik — KolkataKnightRiders (@KKRiders) April 21, 2024
आयपीएल 2024 चा 10 वा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB आणि KKR यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने अवघ्या 16.5 षटकांत 3 गडी गमावून 186 धावा केल्या. 9 चेंडू बाकी असताना 7 गडी राखून सामना जिंकला.