सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा(फोटो-सोहल मीडिया)
IND vs PAK, Asia cup 2025 Final match : आशिया कप २०२५ स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण करण्यात आले आहे. आजचा सामना महामुकाबला असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपली क्षमता पणाला लावणार आहेत.
हेही वाचा : IND VS PAK : ‘Boycott’ चा आवाज ओसरला! विजेतेपदाच्या सामन्याच्या तिकिटांसाठी उडाली धावपळ
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने सलग ६ विजय मिळवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर सूर्यकमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून आपला विजयी रथ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल तर या पाकिस्तान हा सामना जिंकून या स्पर्धेत भारताकडून दोन परभवांचा बदला घेण्यास उत्सुक असणार आहे. आता या सामन्यात भारताची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी पाहता भारत सहज पाकिस्तानला पराभूत करले. परंतु, पाकिस्तान संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेला पराभूत करीत जबरदस्त पुनरागमन केले आहे,. त्यामुळे सलमान अली आगा आर्मी विजय मिळवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. त्यामुळे हा सामना अधिक रंजक होणार हे मात्र नक्की.
भारताचा टी २० रेकॉर्ड बघितला तर पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीने आधिल चांगला असल्याचे आपल्याला दिसते. २००७ मध्ये या फॉरमॅटची सुरवात करण्यात आली. या स्वरूपात पाकिस्तान संघाने जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना केला केला आहे तेव्हा भारताने त्यांना पराभव केला आहे. दोन्ही देशांमधील खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांपैकी भारताने ११ सामने आपल्या खिशात घातले आहेत. तर पाकिस्तानला फक्त ३ सामने खिशात घालता आले आहेत. तसेच आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत देखील भारताने या आधी पाकिस्तानला दोनदा पराभूत केल आहे.
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.