केकेआरचा संघ प्लेऑफ मध्ये जाणार? (फोटो - ट्विटर)
केकेआरने जिंकला सलग चौथा सामना
अजिंक्य रहाणेचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
31 मे रोजी होणार आयपीएलचा अंतिम सामना
Tata IPL 2026 KKR Playoff: काल दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात केकेआरने दिल्लीचा 8 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सलग चौथा विजय केकेआरने मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या प्ले ऑफ मध्ये जाण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. आता हे समीकरण कसे होऊ शकते याबाबत जाणून घेऊयात.
केकेआरने सलग 4 सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली आहे. या विजयामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम असून आगामी सामन्यांमध्ये गुणतालिकेतील समीकरणं अधिकच रंजक होणार आहेत. केकेआरला प्ले ऑफमध्ये प्रवेश करायचं असेल तर उर्वरित पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. जर केकेआरने आपले उर्वरित चारही सामने जिंकले, तर त्यांच्या खात्यात एकूण 1 7गुण होतील. 17 पॉईंट्ससह केकेआर सहजपणे प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
सध्या केकेआरचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तयांचे 9 पॉईंट्स झाले आहेत. केकेआरला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी अद्याप बरीच लढाई जिंकणे महत्वाचे असणार आहे. सलग चांगल्या कामगिरीमुळे केकेआरचे आव्हान संपुष्टात आलेले नाही. सध्याचे समीकरण पाहता कोणताही संघ प्लेऑफ मध्ये जाऊ शकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. चांगल्या फरकाने केकेआरने सामना जिंकला असल्यामुळे त्यांच्या रनरेटमध्ये देखील फायदा झाला आहे.






