फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Punjab Kings 1st innings report : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे या सामन्याचा आत्तापर्यंत पहिला डाव संपला आहे. यामध्ये पहिले फलंदाजी करून 172 धावांचे लक्ष उभे केले आहे. लखनऊ सुपर जॉइंट्स आयपीएल २०२५ चा तिसरा सामना खेळत आहे तर पंजाब किंग्स त्यांचा दुसरा सामना आज खेळत आहे. दोन्ही संघ त्यांच्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. या सामन्या आधी लखनऊच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभव तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला होता. पंजाब किंग्सच्या संघाने पहिल्याच सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवला होता सध्या श्रेयस यांचा संग दुसऱ्या विजयाचा शोधात आहे.
लखनऊ विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये पहिला डाव संपला आहे या पहिल्या डावाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाले तर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये त्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी आणखी एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांना निराश केले. एडन मायक्रमने संघासाठी १८ चेंडूंमध्ये २८ धावा खेळूया. यामध्ये त्याने एक षटकार आणि चार चौकार मारले. मिचेल मार्श पहिला चेंडूत बाद झाला मागील सामन्यांमध्ये त्याने कमालीची फलंदाजी केली होती.
Innings Break!#PBKS got off to a strong start ☝
But #LSG fought back with some firepower 🔥
Who will bag the 2⃣ points? 🤔
Updates ▶ https://t.co/j3IRkQFrAa #TATAIPL | #LSGvPBKS | @LucknowIPL | @PunjabKingsIPL pic.twitter.com/RnM23KBBFv
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2025
तर मागील दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा निकालोस पुरण हा ३० चेंडू खेळून ४४ धावा करून युझवेंद्र चहलने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये पुरणने दोन षटकार आणि पाच चौकार मारले. रिषभ पंतचा फ्लॉप शो अजूनही सुरू आहे तो आणखी एकदा स्वस्तात बाद झाला तो पाच चेंडू खेळून २ धावा करत त्याला ग्लेन मॅक्सवेलने बाहेरचा दाखवला. डेव्हिड मिलर देखील संघासाठी फार मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने १८ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या आणि त्याला मार्को जान्सनने पवेलियनचा रस्ता दाखवला.
पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने संघासाठी तीन विकेटची कमाई केली. तर लॉकी फर्ग्युसन, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जानसन, युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेटची कमाई केली. लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाकडे त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे पण आता पंजाब टीमचे फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे त्यांचे लक्ष असणार आहे.