फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
पाकिस्तानचा स्लो ओव्हर रेट: न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये T२० मध्ये मालिका झाली होती. या मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानला एकतर्फी पराभूत केले होते. सध्या या दोन्ही संघामध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना झाला आहे. यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव केला होता. आता या मालिकेचा दुसरा सामना २ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. याआधी या सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या पराभवावर आयसीसीने मीठ टाकले आहे. स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला किवी संघाकडून ७३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान संघाला त्यांच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कॅप्टन मोहम्मद रिझवानने आपली चूक मान्य केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या ३४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २७१ धावांवर बाद झाला.
Pakistan fined for slow over rate in first #NZvPAK ODI.
Read more ⬇️https://t.co/64jbWdwwAv
— ICC (@ICC) April 1, 2025
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे दुःख पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आणखी वाढले आहे. स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने रिझवानच्या आर्मीला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ चे उल्लंघन केल्याबद्दल संघाला दोषी ठरवण्यात आले आहे. कॅप्टन रिझवानने चूक मान्य केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ विकेट्स गमावून ३४४ धावा केल्या. संघाकडून मार्क चॅपमनने १३२ धावांची शानदार खेळी केली. त्याच वेळी, डॅरिल मिशेलने ७६ धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण पाकिस्तान संघ फक्त २७१ धावांवर बाद झाला.
३४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ एकेकाळी चांगल्या स्थितीत दिसत होता. बाबर आझम क्रीजवर सेट होता. तथापि, यानंतर संघाचा फलंदाजीचा क्रम अचानक घसरला. ७८ धावा करून बाबर बाद झाला तेव्हा संघाचा स्कोअर २४९ धावांवर होता. यानंतर, फलंदाजांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धा सुरू झाली आणि काही वेळातच संपूर्ण पाकिस्तान संघ २७१ धावांवर आटोपला. पाकिस्तानने शेवटच्या ७ विकेट फक्त २२ धावांत गमावल्या.