फोटो सौजन्य : ICC
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या पहिल्या दिनाचा सविस्तर अहवाल : दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्याचा पहिला दिवस काल पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बहुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कागिसो रबाडा याने कमालीची कामगिरी केली. रबाडा याने संघासाठी पाच विकेट मिळवले वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पहिल्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिले फलंदाजी करत 212 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लॉर्ड्स मैदानावर कहर केला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर उस्मान ख्वाजा शून्यवर बाद झाला. तर लाबूशेन जाने 17 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाने स्टीव्ह स्मिथ आणि बेव वेब्स्टर यांच्या जोरावर 212 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ याने आणखी एकदा कमालीची कामगिरी केली त्याने 66 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने दहा चौकार मारले. त्याने कठीण काळामध्ये मैदानावर उभे राहून धावा केल्या त्याचबरोबर वेबस्टर याने देखील संघासाठी 72 धावांची खेळी खेळली. या त्याने 11 चौकार मारले.
अलेक्स कॅरी याने संघासाठी फक्त 23 धावा केल्या तर ट्रॅव्हल्स हेड देखील फेल ठरला. हेड आणि फक्त 11 धावा करून विकेट गमावली याव्यतिरिक्त सर्व खेळाडू हे सिंगल डिजिटमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या दिनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सर्वबाद केले.
Stumps on Day 1 of the #WTCFinal 🏏, a day of high-quality Test cricket with relentless intensity 🔥.
🇿🇦 South Africa ends on 43/4, trailing by 169 runs. A brilliant middle session with the ball, followed by a hard-fought final phase to close out the day. 👏
🕥 Day 2 action… pic.twitter.com/lDFLR2TrPs
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 11, 2025
पहिल्या दिनाच्या समाप्तीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा फायनल मध्ये सध्या आता पहिल्याच इनिंग मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये पहिल्या दिनाचे समाप्ती वर दक्षिण आफ्रिकेचे संघाने चार विकेट्स कमावले आहेत तर 43 धावा केल्या आहेत. एडन मार्करम रायन रिकर्टन मुल्डर आणि ट्रस्टन्स स्टॅब्स यांनी विकेट गमावले आहे. रायन रिकर्टन याने 16 धावा केला इतर तीनही खेळाडू हे सिंगल डिजिटमध्ये परतले. सध्या बहुमा हा तीन धावा करून आबाद आहे तर डेव्हिड बेंडिंगम हा देखील संघासाठी खेळत आहे त्याने नऊ चेंडूंमध्ये आठ धावा करून नाबाद आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर कागिसो रबाडा याने संघासाठी पाच विकेट्स घेतले. त्याने उस्मान ख्वाजा, कॅमेरान ग्रीन, बेव वेबस्टर, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जॉन्सन याने संघाला तीन विकेट्स मिळवून दिले. तर केशव महाराज आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.