फोटो सौजन्य - bdcrictime.com सोशल मिडीया
मेहदी हसन : बांग्लादेश विरूद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत दोन्ही संघामध्ये 1-1 अशी बरोबर झाली पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाने 3 विकेट्स विजय मिळवला होता. त्यानंतर झिम्बाब्वेच्या संघाला बांग्लादेशच्या संघाने पराभूत करुन सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली आहे. दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने झिम्बाब्वेचा एक डाव आणि १०६ धावांनी पराभव केला. मेहंदी हसन मिराझ बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. मेहंदीने सुरुवातीला फलंदाजीने चांगली कामगिरी केली आणि शानदार शतकी खेळी केली. शतक ठोकल्यानंतर बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजाची जादूही चांगलीच गाजली.
दुसऱ्या डावात मेहंदीने आपल्या फिरकी गोलंदाजीनी कहर केला आणि पाच विकेट्स घेतल्या. मेहदी हसन हा एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट घेणारा बांगलादेशचा तिसरा खेळाडू ठरला. पहिल्या डावात झिम्बाब्वेने २२७ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने ४४४ धावा केल्या. दुसऱ्या डावात, झिम्बाब्वेचा फलंदाजीचा क्रम पत्त्याच्या गठ्ठ्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ फक्त १११ धावांवर बाद झाला.
Mehidy Hasan Miraz dazzled with both bat and ball as Bangladesh sealed a thumping win against Zimbabwe 👌#BANvZIM pic.twitter.com/aoN7iWasU7
— ICC (@ICC) April 30, 2025
तैजुल इस्लामच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात झिम्बाब्वेला २२७ धावांवर रोखले. तैजुलने कहर केला आणि सहा विकेट्स घेतल्या. यानंतर, बांगलादेशकडून टॉप ऑर्डरमध्ये शदनाम इस्लामने १२० धावांची शानदार खेळी केली. त्याच वेळी, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मेहदी हसननेही बॅटने खूप धमाल केली. मेहंदीने १६२ चेंडूंचा सामना करत १०४ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारला.
फलंदाजीने चांगली कामगिरी केल्यानंतर, मेहंदीने झिम्बाब्वेच्या दुसऱ्या डावात आपल्या फिरकीची जादू पसरवली. बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजासमोर झिम्बाब्वेचा फलंदाजीचा क्रम पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. मेहंदीने २१ ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त ३२ धावा देऊन पाच विकेट्स नावावर केले. मेहदी हसन मिराज बांगलादेशकडून एकाच कसोटीत शतक आणि पाच विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त शाकिब अल हसन आणि सोहाग गाजी यांनाच ही कामगिरी करता आली आहे.
मेहदी हसनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे बांगलादेशने दुसरी कसोटी एक डाव आणि १०६ धावांनी जिंकली. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मेहेदीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर आणि स्पर्धावीर म्हणून गौरविण्यात आले. झिम्बाब्वेने पहिली कसोटी ३ विकेट्सने जिंकली.