मिसबाह-उल-हकचा राजीनामा (फोटो- ians)
पाकिस्तान क्रिकेट संघाचा टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्याने पराभव होत आहे. अत्यंत निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांनी राष्ट्रीय निवड समितीच्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे आणि धक्कादायक फेरबदल करण्यात आल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर मिस्बाह-उल-हकचा निर्णय समोर आला आहे.
पाकिस्तानच्या कसोटी संघात मोठे आणि धक्कादायक फेरबदल करण्यात आल्याच्या अवघ्या २४ तासांनंतर मिस्बाह-उल-हक यांचा हा निर्णय समोर आला आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा हा राजीनामा अद्याप अधिकृतपणे स्वीकारला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिस्बाह यांच्या या निर्णयामुळे पीसीबीच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. तसेच कर्णधार म्हणून बाबर आझम देखील अपयशी ठरताना दिसून येत आहे. या सिरिजमधला तिसरा सामना 9 सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे.
ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…
मिस्बाह-उल-हकने केवळ राष्ट्रीय निवड समिती सदस्याच्या पदाचाच राजीनामा दिला नसून, लाहौर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील फलंदाजी सल्लागार पदाचा देखील राजीनामा दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानच्या फलंदाजीची दयनीय अवस्था पाहायला मिळाली होती. संघातील प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून निवड समितीवर आणि पीसीबीच्या कारभारावर जोरदार टीका होत होती.
खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?
इंग्लंडच्या संघाने या सिरिजमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये दारुण पराभव केला आहे. लॉर्डसच्या कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानच्या संघाचा 194 रन्सने दारुण पराभव केला आहे. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ या सिरिजमध्ये 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिसऱ्या सामन्याच्या आधी तर संघात आणि कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल केले आहेत.






