फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विजय हजारे ट्रॉफी : भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. यामध्ये आतापर्यत भारताच्या संघाने तीन सामने खेळले आहेत या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी आहे. तर एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. त्याआधी जर बोलायचं झालं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या संघाची घोषणा जेव्हा करण्यात आली होती तेव्हा मोहम्मद शामीचे नाव यादीमध्ये नसल्यामुळे चाहते निराश झाले होते, त्यानंतर सांगण्यात आले होते की, मोहम्मद शामी पूर्णपणे दुखापतीमधून सुधारणा न झाल्यामुळे त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. आता सध्या शामी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे आणि त्यामध्ये तो सध्या कमालीची कामगिरी करत आहे. यांचदरम्यान आता उद्यापासून म्हणजेच २१ डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीचे सामने सुरु होणार आहेत.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने शामी विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे. बंगालचा संघ आपला पहिला सामना शनिवारी २१ डिसेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध खेळणार आहे. अलीकडेच रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली T२० ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शामी आता दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत तो सहभागी होऊ शकणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी सामन्यासाठी केला संघ जाहीर, 19 वर्षीय खेळाडूला मिळाली संधी
भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शामीच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. ब्रिस्बेन कसोटीनंतर पत्रकार परिषदेत रोहितने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे शामीच्या आरोग्याची स्थिती आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी केली. रोहित म्हणाला, “मला वाटते की NCA ने आम्हाला शमीची स्थिती आणि त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेबद्दल अपडेट देण्याची वेळ आली आहे.” शमीच्या कामाचा ताण आणि त्याच्या गुडघ्याच्या समस्येबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली. रोहित म्हणाला की, “मध्यभागी कोणताही खेळाडू बाहेर पडावा, असे आम्हाला वाटत नाही, याचा संघावर नकारात्मक परिणाम होतो.”
Just 2⃣ days to go for the #VijayHazareTrophy ⌛️
A battle across five groups, with 38 teams chasing glory 🏆
The groups are set. Who’s your pick to reign supreme this season? 🔥@IDFCFIRSTBank pic.twitter.com/5csPnk8A8M
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 19, 2024
शामी गेल्या एक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने अखेरचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. विश्वचषकातील त्याच्या चमकदार कामगिरीनंतर, जानेवारी २०२४ मध्ये त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तीन महिने NCA येथे पुनर्वसन प्रक्रियेत राहिले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मोहम्मद शमीचा संघात समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु शमीच्या फिटनेसमुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.