फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्याच दिनी भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांना बाद केले आणि डाव संपूष्टात आणला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बुटका म्हटले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर समोर आली आहे.
जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराला बुटके असे संबोधून लज्जास्पद वक्तव्य केले. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजी प्रशिक्षक अॅशवेल प्रिन्स यांनी आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या दिवसानंतर ते म्हणाले, “नाही. कोणतीही चर्चा होणार नाही. हे पहिल्यांदाच माझ्या लक्षात आले आहे. जे घडले त्यात काही अडचण येईल असे मला वाटत नाही.”
42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
तो पुढे म्हणाला की, सिराजला त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये त्याची लय नीट जमली नाही. तथापि, दुसऱ्या स्पेलमध्ये जेव्हा त्याने एंड बदलले तेव्हा तो परत आला आणि तो बराच चांगला होता. त्याला त्याची लय आणि लाईन सापडली. पण बुमराह सातत्याने धावा करत होता आणि फिरकीपटूही खूप चांगले होते. त्यामुळे मला वाटते की काही चांगले चेंडू होते आणि कधीकधी फलंदाज चांगली कामगिरी करतात. त्याबद्दल तुम्ही फारसे काही करू शकत नाही. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. खेळात अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आणि आशा आहे की, दुसऱ्या डावात आपण चांगले प्रदर्शन करू.
Most Shameful and Unlikeable Team of Cricket-India. Jasprit Bumrah and Rishabh Pant should be immediately banned and India should apologise to Temba Bavuma. Shame on Commentators as well for not pointing it out pic.twitter.com/TGzu8X6wgn — dr.neha singh /MBBS (@nehhaasingh) November 14, 2025
ही घटना १३ व्या षटकात घडली, जेव्हा बुमराहने टेम्बा बावुमाला गोलंदाजी केली आणि नंतर एलबीडब्ल्यूचे अपील केले. डीआरएस घेण्याच्या निर्णयावरून पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यात वाद झाला. त्यानंतर बुमराहने बावुमाला बुटके म्हटले. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ १५९ धावांवरच संपुष्टात आला. संघाच्या एकाही फलंदाजाला लक्षणीय खेळी करता आली नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने १४ षटकांत २७ धावा देत पाच बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.






