केडीएमसी आणि उल्हासनगरमधील सर्व शाळा, कॉलेजेसना सुट्टी जाहीर (Photo Credit- AI)
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होऊन विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी केडीएमसी आणि उल्हासनगरच्या शिक्षण विभागाने तात्काळ सुट्टीचा निर्णय घेतला आहे.
#schoolupdeat उल्हासनगर,कल्याण, डोंबिवली शहरातील सर्व शाळांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे.👇#rainupdet #kdmc #ulhasnagar #aplidombuvli #kalyankar #allulhasnagar #dombivlikar pic.twitter.com/SkBiklpsK3 — yuvraj surle (@SurleYuvraj) July 3, 2026
दोन्ही महानगरपालिकांनी परिपत्रकाद्वारे सर्व खासगी आणि शासकीय शाळा-कॉलेज व्यवस्थापनांना कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच महाविद्यालय व शाळा व्यवस्थापनाने यापुढील कालावधीत परिस्थितीचा विचार करुन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरक्षिततेस धोका निर्माण होणार नाही, याबाबत योग्य त्या उपाययोजना करावयाच्या आहेत.
अतिवृष्टी व पुढील चार दिवस मुसळधार पावसाने संकेत हवामान खात्याने दिल्याने घाट माथ्यावर दरडीचा सातत्य लक्षात घेता प्रवासी वर्गाच्या सुरक्षित साठी पोलादपूर सुरूर राज्य मार्गवरील आंबेनली घाटातील वाहतूक ३ जुलै २०२६ ते ७ जुलै २०२६ पर्यत सर्व वाहतुकी साठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रक द्वारे दिले आहेत.
पोलादपूर आंबेनळी महाबळेश्वर राज्य महामार्ग हा सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत संवेदनशील, भूस्खलनप्रवण, दरडप्रवण व उच्च जोखीम असलेल्या घाट विभागातून जात असून, सदर मार्गाची भौगोलिक, भूगर्भीय व हवामानविषयक वैशिष्ट्ये विचारात घेतल्यास पावसाळ्याच्या कालावधीत हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतो.
सदर मार्गाचा मोठा भाग तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर, दाट वनक्षेत्र तसेच भूस्खलनास प्रवृत्त होणाऱ्या भूभागामधून जातो. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार या परिसरात दरवर्षी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून अनेक वेळा अल्प कालावधीत अत्यंत तीव्र स्वरूपाचा पाऊस नोंदविला जातो.
Pune Rain Alert: पुण्यात मध्यम पाऊस तर घाटमाथ्यावर भयंकर संकट; बंगालच्या उपसागरात…, रेड अलर्ट जारी






